शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

जळगावात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:49 AM

सुविधा

ठळक मुद्देदोन वर्षात होणार पूर्णआवश्यक सुविधा मिळणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - जिल्हा रुग्णालयातील भार व कमी पडणारी जागा याला पर्याय म्हणून मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले असून दोन वर्षात हे रुग्णालय सुरू होण्याचा अंदाज आहे. यामुळे जिल्हाभरातील महिला रुग्णांना मोठा आधार होणार आहे.जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याने जागा व खाटा कमी पडू लागल्या. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय असावे, असा विचार पुढे आला व मोहाडी रस्त्यावर १०० खाटांच्या रुग्णालयास यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.रुग्णालय मंजुरीबाबत १० मार्च २०१६ रोजी झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत निर्णय होऊन त्यानुसार मान्यता देण्यात आली. तसेच यासाठी शासनाने ७५ कोटी ३१ लाख २१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रक व नकाशांना त्यावेळी प्रशासकीय मान्यता दिली. या रुग्णालयासाठी मोहाडी रस्त्यावर सहा एकर जागा मिळून ती हस्तांतरीतही झाली.पाण्याची व्यवस्था झाल्याने दिलासासर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०१८मध्ये सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने त्यासाठी येथे कुपनलिका करण्यात आली व पाणी लागल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.सा.बां. विभागाकडून बांधकाम करून घेणारआरोग्य विभागाकडे जागा हस्तांतरीत झाली असली तरी या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर रुग्णालय आरोग्य विभागाकडे येईल व येथे प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू होईल. साधारण दोन वर्षात बांधकाम पूर्ण होऊन हे रुग्णालय रुग्णसेवेत येईल, असा अंदाज आहे.आवश्यक सुविधा मिळणारयेथे दाखल होणाºया महिलांसाठी आवश्यकता पडल्यास एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन व इतर संबंधित उपकरणेही येथे राहणार आहे. या सोबतच नवजात बालकांसाठी नवजात शिशू कक्ष व त्यामध्ये बालकांना ठेवण्यासाठी पेटीदेखील राहणार आहे. या ठिकाणी १०० खाटांचे महिला रुग्णालय तसेच मुख्य इमारत व अधिकारी-कर्मचाºयांचे निवासस्थान राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णालयाचे काम होणार असून दुसºया टप्प्यात निवासस्थानांचे काम होईल, असे सांगण्यात आले.मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणा-या महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले असून यामध्ये पहिल्या टप्प्यात रुग्णालयाच्या इमारतीचे काम होईल व दुसºया टप्प्यात निवासस्थानाचे काम होणार आहे.- डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव