जळगाव : शिवसेनेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांसाठी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी इच्छुकांच्या सोमवारी शहरातील सागर पार्क मैदान परिसरातील एका हॉटेलात मुलाखती घेण्यात आल्या. त्यात 34 जि.प. गटांसाठी 153 उमेदवार इच्छुक असल्याचे मुलाखतीदरम्यान समोर आले. नेत्यांनी काही जि.प.गटांसाठी उमेदवार निश्चित केले व सायंकाळी यादी जाहीर करण्याची तयारी केली.. पण निश्चित उमेदवारांची यादी जाहीर करू नका.. त्यामुळे काही चुकीचे संदेश जायला नको, इतर वाद व्हायला नको.., अशी सूचना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकरांनी केली. यामुळे निश्चित उमेदवारांची यादी सेना नेत्यांना जाहीर करता आली नाही. जिल्ह्यात विविध गटांमध्ये तीन उमेदवारांची नावे निश्चित केली, पण ही नावे जाहीर करणे टाळले. राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी मुलाखती घेतल्या. तीन उमेदवारांची नावे मिर्लेकरांनी थांबविलेजळगाव तालुक्यातील एक व इतर ठिकाणच्या दोन उमेदवारांची नावे सोमवारी सायंकाळी जाहीर करण्याचा निर्णय सेनेचे नेते व पदाधिका:यांनी घेतला होता. त्याबाबत संपर्कप्रमुख मिर्लेकर यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. त्यास मिर्लेकर यांनी नकार दिला. यामुळे तीन निश्चित नावे सोमवारी जाहीर होऊ शकली नाहीत. मिर्लेकर यांचा सोमवारी वाढदिवस होता, त्यामुळे ते मुलाखतीसाठी येऊ शकले नसल्याची माहिती मिळाली. काही उमेदवारांनी सोबत समर्थकही आणले होते. त्यामुळे संबंधित हॉटेल व परिसराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले. एकाच वेळी सर्वाना पाचारणमुलाखतीसाठी संबंधित गट व गणाचे नाव उच्चारून इच्छुकांना बोलावले जात होते. पण मुलाखतीसाठी एका इच्छुकाला स्वतंत्र वेळ न देता एकाच वेळी बोलावून त्यांची नावे व इतर माहिती घेऊन त्याची नोंद केली जात होती. चार ते पाच मिनिटात इच्छुकांशी एकाच वेळी चर्चा करून नंतर कळवू, असा संदेश देऊन परत पाठविले जात होते. इच्छुकांसोबत त्यांचे समर्थक चारचाकी, दुचाकी वाहनांवर आले होते. यामुळे संबंधित हॉटेल व परिसरात वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. हॉटेलला दुचाकींचा गराडा असल्याचे दिसून आले. सात तालुक्यांसाठी मुलाखतीशिवसेनेकडून जि.प.साठी उमेदवारी मिळावी यासाठी जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, भडगाव व चाळीसगाव या तालुक्यांमधील 153 जणांनी मुलाखती दिल्या. तर पं.स.साठी आठ तालुक्यांसाठी 324 जणांनी मुलाखती दिल्या. एकूण 577 जणांच्या मुलाखती पदाधिकारी व नेत्यांनी घेतल्या. शिवसेनेची जि.प. गटासाठी मुलाखती दिलेल्या इच्छुकांची तालुकानिहाय संख्या (कंसात संबंधित तालुक्यातील एकूण गट) : जळगाव 42 (5), धरणगाव 27 (3), अमळनेर 11 (11), पारोळा 23 (4), एरंडोल 23 (3), भडगाव 21 (3), चाळीसगाव 16 (3). पं.स.साठी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिलेल्यांची तालुकानिहाय संख्या - जळगाव 72 (10), 48 (6), अमळनेर 22 (8), पारोळा 26 (8), एरंडोल 31 (06), पाचोरा 71 (10), भडगाव 15 (6), चाळीसगाव 39 (14).
संपर्कप्रमुखांनी उमेदवारांची घोषणा थांबविली
By admin | Published: January 10, 2017 12:15 AM