प्रवीण अहिरेवाघडू, ता.चाळीसगाव : पुलालगत असलेला कच्चा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे शनिवारी सायंकाळी वाहून गेल्याने चाळीसगाव ते नागद असा संपर्क तुटला.वाघडू येथे पुलाचे काम सुरू आहे. यामुळे बाजूला मोरी टाकून कच्चा रस्ता बनवला होता. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आता नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीचे पाणी वाहत असल्याने कच्चा रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. परिणामी चाळीसगाव ते नागद जाण्याचा संपर्क तुटला. परिणामी वाहने जागीच थांबविण्यात आलेली आहेत. शनिवारी रात्री आठपासून ही परिस्थिती आहे. यामुळे वाघडू येथे काही लोक थांबून आहेत. मुक्काम झाल्याने वाघडू गावातील नागरिकांनी थांबलेल्या लोकांची भोजनाची व राहण्याची सोय करून दिली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुलाचे काम सुरू झाले. थांबलेल्यांना व इतरांसाठी स्थानिकांनी दोर बांधला. या दोराला धरून नागरिकांना पुढे जावू देण्यात आले.दरम्यान, वाघडू येथे पुलाचे काम करणाºया ठेकेदाराकडून धिम्या गतीने काम होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कच्चा रस्ता वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 5:00 PM
पुलालगत असलेला कच्चा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे शनिवारी सायंकाळी वाहून गेल्याने चाळीसगाव ते नागद असा संपर्क तुटला.
ठळक मुद्देचाळीसगाव ते वाघडू दरम्यान तुटला संपर्कवाहने थांबविली होती जागेवरच