जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या अनेक गावांवर आता पावसाळ्यात दूषित पाण्याचे संकट घोंगावत आहे़ जिल्हाभरातील ६४ गावांचे पाणी नमूने हे दूषित आढळून आलेले आहे़ जून महिन्याच्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात पाणीपुरवठा होणाºया स्त्रोतांमधून पाणी नमूने घेऊन ते पिण्यासाठी योग्य आहे किंवा दूषित आहेत का याबाबत तपासणी करण्यात येत़साधारण दर महिन्याला असे नमूने घेऊन त्यांचा एकत्रित अहवाल काढला जातो़ त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात १५८२ पाण्याचे नमूने तपासण्यात आले़ त्यापैकी ६४ नमूने दूषित आढळून आलेले आहेत़ दूषित नमुन्यांची टक्केवारी ४ टक्के असून गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ही वाढल्याचे समजते़ टंचाईची परिस्थिती काही अंशी मार्गी लागत असताना आता दूषित पाणीपुरवठ्याचा या गावांना सामना करायचा आहे़ त्यासाठी स्थानिक प्रशासनाने, स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने अधिक सतर्कता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे़रावेर तालुक्यात सर्वाधिक दूषित नमूनेजिल्हाभरातील दूषित पाण्यात रावेर तालुक्यातील सर्वाधिक १४ गावांचे पाणी नमूने दूषित आढळून आलेले आहे़ त्या खालोखाल भुसावळ ८, जामनेर ७, जळगाव ७, चोपडा ७, मुक्ताईनगर ५, भडगाव ४, बोदवड ४, चाळीसगाव ३, पाचोरा ३, यावल, पारोळा, १-१ असे हे दूषित पाणी आढळून आलेले आहेत़दूषित पाणी आढळून आलेल्या ठिकाणच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करु. अहवाल आल्याच्या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तपासणीनुसार योग्य प्रमाणात टीसीएल टाकून उपायोजना राबवू.- समाधान वाघ, प्रभारी जिल्हा आरोेग्य अधिकारीहे उपाय करापावसाळ्यात दूषित पाण्यामुळे डायरिया, कावीळ, अतिसार, कॉलरा आदी साथरोगांची लागण होते. अशा स्थितीत पाणी किमान दहा मिनिटे उकळून व माठात भरून मगच ते प्यावे, बाहेरचे खाणे, पाणी पिणे टाळावे.- डॉ़ डि़ आऱ जयकर
जळगाव जिल्ह्यातील ६४ गावांमध्ये दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:02 PM