भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी पुरवठा हे दूषित व दुर्गंधीयुक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात आरोग्याच्या दृष्टीने आधीच भीती निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने तत्पर उपाययोजना करून समस्या त्वरित सोडवली.तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात साकेगावकर पाण्याविषयी भाग्यशाली आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात पाण्याची टंचाई भासत असताना अनेक ठिकाणी पंधरा दिवस व महिन्याआड पाणी येत होते. मात्र साकेगाव येथे मुबलक पाणीपुरवठा होता. यंदाही मुबलक पाणीपुरवठा होत आहे.मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त येत असल्यामुळे नागरिकांच्या मनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेत पाणीपुरवठा ज्या जलकुंभातून व विहिरीतून होतो त्यात टीसीएल पावडर टाकून शुद्ध पाणीपुरवठा व्हावा याकरिता उपाययोजना केल्या.पाण्याची नासाडी नकोसाकेगाव जलकुंभाला एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रातून व ग्रामपंचायतच्या विहिरीतून पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आहे. मुबलक पाणीपुरवठा ही साकेगावची जमेची बाजू, मात्र रात्रीच्या वेळेस अनेकवेळा उंच टेकडीवरील जुना जलकुंभ भरल्यानंतर तासन्तास पाणी हा वाया जात असते. यामुळे सभोवतालच्या परिसरातील लोकांच्या भिंतींना सरदावे लागलेले आहे, भिंतींना रंगरंगोटी करूनसुद्धा या परिसरातील भिंती पाणी सोडतात. निसर्गाची साकेगावकरांना पाण्याची देणगी दिली असली तरी त्याचा सदुपयोग व्हावा, नासाडी नको असे सुज्ञ व पर्यावरण प्रेमींकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
साकेगावात दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 4:29 PM
तालुक्यातील साकेगाव येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणी पुरवठा हे दूषित व दुर्गंधीयुक्त होत आहे.
ठळक मुद्देग्रा.पं.प्रशासनातर्फे त्वरित उपाययोजनापाण्याची नासाडी नको