शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

जळगावात वाढदिवसाच्या पार्टीत वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 1:05 PM

जळगाव : शहरातील शेरा चौक व पिंप्राळा हुडको भागात रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाल्याच्या घटना घडल्या. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेरा चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलतानी व पटेल या दोन गटात वाद झाले.नूर मोहम्मद पटेल (रा.शेरा चौक परिसर) यांच्या घरात घुसून त्यांना आरोपी मुसा रमजान मुलतानी व ...

जळगाव : शहरातील शेरा चौक व पिंप्राळा हुडको भागात रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाल्याच्या घटना घडल्या. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेरा चौकात रात्री ११ वाजेच्या सुमारास मुलतानी व पटेल या दोन गटात वाद झाले.नूर मोहम्मद पटेल (रा.शेरा चौक परिसर) यांच्या घरात घुसून त्यांना आरोपी मुसा रमजान मुलतानी व आसीफ मुलतानी आणि अनस मुलतानी या तिघांनी मद्यपान करुन मारहाण केल्याची तक्रार नूर मोहम्मद यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाल दिली. त्यावरुन रात्री १ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तर मुलतानी गटातर्फेही पटेल यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे वृत्त कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे व विजय पाटील यांनी धाव घेतली. काही तरुणांना ताब्यात घेतले.वाढदिवसाच्या पार्टीत वादंगपिंप्राळा हुडको परिसरातही रात्री ११.३० वाजेच्या सुमारास भिल्ल व मांग या दोन समाजातील तरुणांमध्ये वाद झाले. वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पिंप्राळा हुडकोत रात्री प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी धाव घेतली व काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव