खेडगाव, ता.भडगाव : येथील पी. डी.सोनवणे यांनी आईच्या स्मृतीनिमित्त गावाला शवपेटी भेट दिली. ग्रामस्थांनी त्यांच्या दातृत्वाचे स्वागत केले आहे.गावी शवपेटीअभावी मृतात्म्यांचे पार्थिव आप्तेष्ट येईपर्यंत व अंत्ययात्रेस उशीर झाल्यास सुस्थितीत ठेवण्याच्या कामी अडचण येत होती.येथील रहिवासी व पाचोरा नगरपालिकेचे मुख्यधिकारी म्हणून सेवा केलेले पांडुरंग दयाराम सोनवणे यांनी आईच्या आठवणी चिरंतन राहाव्यात म्हणून साठ हजार रुपयात स्टिलची वातानुकूलित शवपेटी गावाला भेट दिली आहे. नुकतेच तिचे लोकार्पण देखील झाले आहे. सोनवणे यांनी ग्रा.पं.सदस्यांकडे शवपेटी सुपुर्द केली. त्यांनी आपल्या मातोश्री सुभद्राबाई यांच्या स्मृती जपण्याच्या हेतुने ग्रामस्थांकडे गावाला काहीतरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर गावी शवपेटीची उणीव असल्याचे व शवपेटीअभावी गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दु:ख बाजुला सारून शवपेटीसाठी भडगाव व आसपासच्या गावांना शोध घ्यावा लागे.आता सोनवणे परिवाराच्या दातृत्वामुळे ही गैरसोय दूर झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सोनवणे यांच्या दातृत्वाचे स्वागत केले आहे.
आईच्या स्मृती जपताना गावाची झाली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 2:24 PM