जळगाव : समांतर रस्त्यावर आकाशवाणी चौकापासून इच्छादेवी चौफुलीपर्यंतच्या चार अतिक्रमण धारकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जप्तीची कारवाई करून रस्त्यावर न बसण्याचा इशारा दिला. तसेच हरिविठ्ठल नगरातील दोन पक्की अतिक्रमणेही काढण्यात आली. समांतर रस्त्यावरील सपाटीकरणाचे काम मनपाने जैन उद्योग समुहाच्या मदतीने सुरू केले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय ते प्रभात चौकापर्यंत बरचसे सपाटीकरणाचे काम झाले आहे तर आकाशवाणी चौकाच्या पुढे व इच्छादेवी चौकाच्या दरम्यानही सपाटीकरणाचे काम झाले. अतिक्रमणे कायममनपाने सपाटीकरणाचे काम काम मदतीतून सुरू केले मात्र या रस्त्यावर अतिक्रमणे वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त दिले होते. त्यानुसार आज दुपारी अतिक्रमण विभागाने आकाशवाणी चौक इच्छादेवी चौकाच्या पुढे काही सिमेंट कुंड्या विक्रेते, दरवाजे, खिडक्या, फर्निचर विक्रेत्यांनी जागा व्यापली होती. यातील चार जणांवर जप्तीची कारवाई मनपा पथकाने केली. विक्रेत्यांना तेथे न बसण्याचा इशारा देण्यात आला.
समांतर रस्त्यावर जप्तीची कारवाई
By admin | Published: January 05, 2017 12:31 AM