जळगाव : मान्सूनच्या परतीनंतर आता हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला सुरुवात झाली आहे. कमाल तापमानासह किमान तापमानात देखील घट होत असून, मंगळवारी शहराचे किमान तापमान १८ अंशावर आल्याने वातावरणात गारवा अनुभवास मिळाला. दरम्यान, आगामी आठवडाभरात किमान पारा आणखीन घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.उत्तर-पूर्व भारतात मान्सून जवळपास परतला आहे. त्यानुसार वातावरणात देखील बदल होत असून, सध्या जिल्ह्यात पूर्वेकडून थंड वारे येत आहेत. त्यामुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, आगामी १५ दिवसात उत्तर भारतातील काश्मिर, हिमाचल प्रदेश भागात बर्फवृष्टी सुरु होण्याचा अंदाज आहे. बर्फवृष्टी झाल्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाल्याने यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कडाक्याची थंडीनेहमी नोव्हेंबर महिन्यापासूनच थंडीला सुरुवात होते. यंदा रात्रीच्या तापमानात घसरणीला लवकर सुरुवात झाली आहे. आता पुढील काही दिवस तापमानात काही प्रमाणात हळूहळू घट होणार आहे. दरम्यान, आगामी दोन दिवसात पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सध्या पूर्र्वेकडून येत असलेल्या थंड वाºयांमुळे किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. आगामी काही दिवसात तापमानाच्या पाºयात हळूहळू घट होणार आहे. तसेच उत्तरेत बर्फवृष्टी सुरु झाल्यानंतर थंडी वाढणार आहे. -शुभांगी भुते, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा
कोजागरीनंतर थंडीची चाहूल, किमान पारा १८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:36 PM