ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.29- नोटा बंदीच्या काळात शेतक:यांचा पैसे सहकारी बँकेत अडकला असून तो अद्याप बदलून मिळला नाही याचा परिणाम पीक कर्जावर होत आहे. केंद्राने सहकारी बँकांचा अडकलेला तो पैसे मोकळा करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे , माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील,विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे आदी होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, नोटा बंदीच्या काळात सहकारी बँका मध्ये शेतक:यांच्या पैश्यांसंदर्भात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी भेटलो असता त्यांनी शेतक:यांच्या खात्यांची तपासणी करून त्याप्रमाणे राज्यातील सर्व सहकारी बँकांमध्ये नाबार्ड व रिझव्र्ह बँकेचे पथक येऊन गेले त्यांनी तपासणी केली त्यामुळे आता केंद्राने सहकारी बँकेत अडकलेला पैसा मोकळा करावा. सहकारी बँकांना पीक कर्ज देने शक्य होईल. यंदा कपाशी बद्दल तक्रार नाही मात्र शेतीची अवस्था गंभीर आहे. पिकांना चांगला भाव मिळतो असेही नाही. शेतीचे अर्थकारण संकटात असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राजकारणात अनेक व्यक्ती भेटतात मात्र त्यातील काही मनावर छाप सोडून जातात त्यात अरुणभाई गुजराथी यांचा समावेश होतो. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.