जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ शनिवारी एका दिवसात तब्बल १११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे़ त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.आता जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३०८२ इतकी झाली आहे़ पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर ५५, भुसावळ १७, जळगाव ग्रामीण, एरंडोल प्रत्यकी ०८, धरणगाव ०६, रावेर, बोदवड प्रत्येकी ०४, यावल,जामनेर प्रत्येकी ०३, चोपडा, पाचोरा, पारोळा प्रत्येकी ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना तीन हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:53 PM