जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबता थांबत नसून दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे. गुरूवारी एका दिवसात तब्बल १६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २२, जळगाव ग्रामीण ०८, अमळनेर १६, भुसावळ ०३, भडगाव ०१, बोदवड ०९, चाळीसगाव ०५, चोपडा ०९, धरणगाव १०, एरंडोल १९, जामनेर ०४, मुक्ताईनगर ०८, पाचोरा ०५, पारोळा ०२, मुक्ताईनगर ०८, यावल ३१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ७९८ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.