उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहर व तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराने कहर केला आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचे तब्बल १०२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात व रोखण्यात कुणाचा दोष व कुणाचे यश याचा शोध घेण्यापेक्षा आता तरी कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाने शहरासह वरणगाव व खडका या ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.महिला गेली होती अंत्ययात्रेतशहरात २५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण समतानगरात आढळला. समतानगरमधील ४५ वर्षीय महिला या कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. ही महिला परिसरातच एका अंत्ययात्रेत गेली होती. त्यावेळेस या महिलेचा संपर्क खंडवा (मध्य प्रदेश) येथील काही नातेवाईकांशी आला. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव हा मध्य प्रदेशातून झाला असावा, असे गृहीत धरण्यात आले. मात्र त्या महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकंदरीत, पाच ते सहा रुग्ण या महिलेच्या संपर्कात आले.कोरोनाने एकाच नव्हे तर अनेक मार्गांनी केला शिरकावत्यानंतर मात्र शहरात पंचशील नगर, आंबेडकर नगर या परिसरातही काही रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. मात्र या रुग्णांचा व पहिल्या रुग्णाचा संपर्क नसतानाही हे रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाने शहरात प्रादुर्भाव सुरूच ठेवला. त्यानंतर खडका रोड येथील एका ५९ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्या महिलेच्या परिसरामध्ये सुरत येथून काही नातेवाईक आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मध्य प्रदेश पाठोपाठ गुजरात राज्यातील लोकांमुळे ही कोरोनाला शहरात प्रवेश करण्यास वाव मिळाला. त्यामुळे गुजरातचा ही सहभाग दिसून आला. दरम्यान, भजे गल्लीतील रुग्ण हा मध्य प्रदेशातील इंदूर येथून आला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतील संपकार्मुळे शहरात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय सिंधी कॉलनीतही एका व्यापाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील डॉक्टर व पालिका कर्मचारी त्यांच्यासह सात ते आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत, कोरोनाने एकाच मार्गे नव्हे, तर अनेक मार्गांनी शहरात शिरकाव केल्याचे दिसून आले.कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरजभुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन स्टेशन आहे. मात्र केंद्राने दोन महिन्यापूर्वीच रेल्वे बंद केल्यामुळे शहरात परराज्यातून कोरोना शिरकाव करण्याचे मार्ग बंद असल्याचे प्रथम वाटत होते. रेल्वे बंद असली तरी शहराचा संपर्क गुजरात, मध्य प्रदेशासह अनेक राज्यांशी जोडलेला आहे . त्यात भुसावळ शहर हे नोकर व व्यापारी वर्गाचे माहेरघर आहे. रेल्वे, आॅर्डनन्स फॅक्टरी, वीज निर्मिती केंद्र यामुळे येथील लोकांचा संपर्क हा देशातील विविध भागांशी येतो. यामुळे शहरात कोरोना शिरकाव करेलच, अशी भीती अगोदरपासूनच होती. त्यासाठी नागरिकांनी बरीच पथ्थे ही पळाली. शासनाच्या लॉकडाऊन व्यतिरिक्त सर्व पक्षांनी दोन वेळेस तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळला. त्यामुळे शहरात कोरोना कुणामुळे आला, कुणामुळे वाढला, कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला, यावर चर्चा करण्यापेक्षा आता हा संसर्गजन्य आजार थांबवता कसा येईल? यासाठी सर्वच अधिकाऱ्यांसह नागरिकांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात सध्या ९२ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर तालुक्यातील वरणगाव येथे सहा व खडका येथे चार रुग्ण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे कोरोनाने तालुक्यात शिरकाव केल्याचे दिसत आहे. परिणामी इतर गावांनी आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वरणगाव येथे प्रतिभा नगरमध्ये तीन, अक्सानगरमध्ये दोन व बिराडी आखाडा परिसर एक अशी सहा रुग्णसंख्या आहे.या भागात आढळले आतापर्यंत पॉझिटिव्हशहरात समतानगर येथे पहिला रुग्ण आढळला असला तरी सध्या सर्वात जास्त रुग्ण शनीमंदिर वार्ड, सिंधी कॉलनी , जाम मोहल्ला, खडका रोड, गंगाराम प्लॉट असल्याचे दिसून येत आहे, तर समतानगर, पंचशीलनगर, आंबेडकर नगर, शांतीनगर, भजे गल्ली, इंदिरानगर, तलाठी कॉलनी, रामदास वाडी, शिवदत्त नगर, डी.एल.हिंदी हायस्कूल मागील फालक नगर, रानातील महादेव मंदिर, हुडको कॉलनी.,महेश नगर आदी भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहे.सहा डॉक्टरही झाले बाधितशहरात कोरोनाने कहर केला असला तरी व्यवसाय व रुग्णसेवा डोळ्यासमोर ठेवून बहुतांशी डॉक्टरांनी व्यवसाय सुरू ठेवले होते. मात्र त्याचा फटका शांतीनगर , सिंधी कॉलनी, खडका रोड, वरणगाव , आनंदनगर, अष्टभूजा देवी परिसरातील डॉक्टरांनाही बसला आहे. यातील सिंधी कॉलनी व शांतीनगर येथील डॉक्टर उपचारानंतर तब्येत सुधारल्यामुळे घरी आले आहे. तर चार डॉक्टर उपचार घेत आहे.१५ रुग्णांचा झाला मृत्यूदरम्यान, शहरात कोरोनामुळे आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पंचशील नगर, आंबेडकर नगर, खडका रोड, गंगाराम प्लॉट, काझी प्लॉट, शनीमंदिर वॉर्ड, फालक नगर, शिवदत्त नगर आदी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. मात्र या रुग्णांना कोरोनासोबत इतर काही आजार होते, असे सांगण्यात आले.
भुसावळात कोरोनाचा गुजरात, मध्य प्रदेशातूून शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 3:17 PM
भुसावळ शहर व तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराने कहर केला आहे.
ठळक मुद्देकोरोनाने शंभरी केली पारग्रामीण भागातही प्रवेश