बोदवड / फैजपूर, जि. जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत बाधा न पोहचलेल्या बोदवडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला बाधा झाली आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या सोबतच यावल तालुक्यातील फैजपूर येथील कोरोना बाधित डॉक्टरच्या पत्नीचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या व्यापाºयाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल शनिवारी रात्री दोन वाजता प्राप्त झाला. यानंतर सकाळीच त्याचा रहिवास असलेला परिसर सील करुन फवारणी करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या १२ जणांनाही क्वारंटाईन करण्याचे काम रविवारी दुपारी पर्यत सुरु होते. परंतु बोदवड रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने दुपारी १२.३० पर्यंत हा रुग्ण घरीच होता.हा रुग्ण व्यापारी आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.बाधित डॉक्टरची पत्नी पॉझिटीव्हशहरातील बाधित डॉक्टरच्या पत्नीचा कोरोना तपासणी अहवालही पॉझिटीव्ह आल्याने फैजपूरात बाधितांची संख्या सहावर पोहचली आहे़ या डॉक्टरला काही दिवसांपूर्वी बाधा झाली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अहवालांमध्ये त्यांच्या पत्नीला या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फैजपूर येथील बाधित महिला ही मिल्लतनगर भागातील रहिवासी असून प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.१९ पोलीस निगेटीव्हदुसरीकडे फैजपूर येथील उर्वरित १९ पोलिसांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अनेक कोरोना योद्धांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती़ त्या पार्श्वभूमीवर या अहवालांकडे सर्वांचे लक्ष लागून होते़चौकटपूर्ण पंधरा तालुक्यांना विळखाकोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या सुमारास प्रचंड वेगाने झाला़ या कोरोनाचा कचाट्यात मे अखेरपर्यंत १४ तालुके सापडले होते़ बोदवडकरांना तेवढा दिलासा होता़ मात्र, शनिवारी आलेल्या अहवालांमध्ये बोदवडमधील एक व्यक्ती बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. असून सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे़कासोद्यातील बाधिताच्या संपर्कातीलआठ जण क्वारंटाईनकासोद्यात ३८ वर्षीय इसमाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील जवळच्या आठ नातेवाईकांना एरंडोल येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. संबधिताचे घर व दुकानाचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यांच्या घरातील सर्व ८ लोकांना एरंडोलला पाठवले आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी दिली
बोदवडमध्ये कोरोनाचा शिरकाव तर फैजपुरातील बाधित डॉक्टरची पत्नी पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:46 PM