लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनाचा महापालिकेतही शिरकाव झाला आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व मुख्य लेखाधिकारी कपिल पवार हे बाधित झाल्यानंतर आता प्रभाग समिती-१ चे अधिकारी विलास सोनवनी हे देखील बाधित झाले आहेत.
एकाच अधिकाऱ्याला सांभाळावा लागतोय इतर विभागांचाही कारभार
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याने त्या अधिकाऱ्यांच्या विभागाची जबाबदारी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे. उपायुक्त संतोष वाहुळे व मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांच्या विभागाची जबाबदारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर, प्रभाग समिती -१ चे अधिकारी विलास सोनवनी हे बाधित झाले आहेत. त्यांचा कारभार प्रभाग समिती-४ चे अधिकारी उदय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.