मागील वर्षभरात कौटुंबिक छळाच्या ९९२ तक्रारी दाखल झालेल्या असल्या तरी त्यातील फक्त २८ प्रकरणात तडजोड झालेली आहे. ५७ प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. २५ प्रकरणांमध्ये पती-पत्नींनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ६९ प्रकरणात तक्रारी करूनही संबंधित व्यक्ती न्यायासाठी आल्याच नाहीत. ६५९ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर सध्या तडजोडीचे काम सुरू आहे. २०१९ मध्ये ११९९ प्रकरणे या विभागाकडे आली होती तर त्यातील २०४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली होती. २८२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले होते तर १९९ प्रकरणे न्यायालयात गेलेली आहेत. ४६४ तक्रारदार अर्ज करूनही या विभागात न्याय मागण्यासाठी आले नाहीत तर ५० प्रकरणे प्रलंबित होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले या विभागाचे प्रमुख असून सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, सविता परदेशी, मनीषा पाटील, वैशाली पाटील, अभिलाषा मनोरे, संगीता पवार आदी जण कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात तडजोड घडवून आणण्याचे कार्य करतात. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच हा कक्ष उघडण्यात आलेला आहे.
१) पॉईंटर्स
२०१९ मध्ये नोंदविलेली प्रकरणे -११९९
२०२० मध्ये नोंदविलेली प्रकरणे -९९२
जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये नोंदविलेली प्रकरणे -१४७
(बॉक्स)
नोकरी गेली, माहेरातून पैसे आण म्हणून...
घर घ्यायचे आहे, वाहन घ्यायचे आहे त्याशिवाय नोकरी नसल्याने घेतलेले कर्ज फेडायचे आहे आदी कारणांसाठी विवाहितांना माहेरुन पैसे आणायला लावल्याचे प्रकरणे जास्त आहेत. उद्योग उभारणीसाठी देखील पैसे आणावेत म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याचे प्रकरणे या काळात समोर आलेली आहेत. अशा प्रकरणांचे थेट पोलिसात ४९८ कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत.
(बॉक्स)
२३२ प्रकरणांत मध्यस्थी
२०१९ मध्ये २०४ तर २०२० मध्ये २८ अशी २३२ प्रकरणांमध्ये मध्यस्थी करण्यात यंत्रणेला यश आले आहे. त्यातही ६५९ अर्ज चौकशीवर ठेवण्यात आले आहेत. २२४ प्रकरणांमध्ये पती-पत्नी न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेत तर दोन वर्षात ३३९ प्रकरणात तडजोड न झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोनाच्या काळात तक्रारीच कमी आलेल्या आहेत त्यामुळे तडजोडीचा आकडाही कमी आहे.