जळगाव : पिंप्राळा भागात गेल्या अनेक दिवसंपासून सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. या भागात रविवारी ९ तर खोटे नगरमध्ये ८ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान शहरात एकत्रित १६९ बधितांची नोंद झाली आणि दोन बधितांचा मृत्यू झाला आहे.शहरात अनेक परिसरात कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे, काही भागात पुन्हा नव्याने रुग्ण समोर येत आहेत. अयोध्यानगरात पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत तर काही परिसरात संसर्ग कायम आहे.पिंप्राळा परिसरात रोज पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान जिल्ह्यात शहरातील दोन वृद्धांसह ८ बधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरातील काही भागात नव्यान रुग्ण आढळून येत आहेत.रविवारी जिल्ह्यात आठ जणांचे मृत्यू झाले. यात जळगाव शहरातील दोन, भुसावळ तालुक्यातील एक, पाचोरा, भडगाव, चोपडा, चाळीसगाव आणि ए्रंडोल प्रत्येकी एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत़्यू झाला. हे सर्व जण साठ वर्षांच्या वरील आहे. या शिवाय पाचोरा येथे आरटीपीसीआरमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. तर मुक्ताईनगर, बोदवड येथे अनुक्रमे दोन व एक रुग्ण आढळून आले. नऊ तालुक्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, ही दिलासादायक घटना म्हणावी लागेल. जिल्ह्यात ७११६ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाच जास्त संख्या जळगाव शहरातील आहे. शहरात रविवारी ४३ रुग्ण बरे झाले. ही संख्या आता ४२८५ झाली आहे.वाघनगरात दुसरा दिवस वाढीचावाघनगरात सलग दुसऱ्या दिवशी ६ रुग्ण आढळले आहेत. या सह पिंप्राळा ९, खोटेनगर ८, रामेश्वर कॉलनी ७, विठ्ठल पेठ , निवृत्ती नागरे आणि वाघनगरात प्रत्येकी ६, मुक्ताईनगर, रामानंद नगर आणि , दांडेकर नगरात प्रत्येकी ५, कोल्हेनगर , गणेश नगर , मोहन नगरात प्रत्येकी ४, आशाबाबा नगर 3, जानकिनगर, पोलीस लाईन, दक्षता नगर, आदर्श नगर, गजानन नगर, रणछोडदास नगर, श्रीकृष्ण कॉलनी, कांचन नगर, सिंधी कॉलनी, दत्त कॉलनी या भागात प्रत्येकी २ तर मेहरूण तलाव, गुरुदत्त नगर, अजिंठा सोसायटी, ब्रूक बॉण्ड कॉलनी, संभाजीनगर, हायवे दर्शन कॉलनी, बीजे मार्केट समोर, जयकिसनवाडी जुने जळगाव या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.
पिंप्राळा, खोटे नगरात कोरोना सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:18 AM