लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन सेवादास दलीचंद जैन व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी लस घेऊन केले. हे सेंटर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी लस घेतली. कांताई नेत्रालयात या लसीकरणासाठी तीन बुथ तयार करण्यात आले आहे. नोंद केलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय व उत्तम प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक असून रजिस्ट्रेशन झाले असले तरी सरकारची मान्यता व व्हेरिफिकेशनसाठी वेळ लागू शकतो. ज्या मोबाइल नंबरने रजिस्ट्रेशन केले आहे तो मोबाइल सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन केले नसेल तर स्लॉट रिक्त असल्यास स्पॉट रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासाठी ओळखपत्र गरजेचे आहे. कोविड प्रतिबंधक लस टोचून घेण्यापूर्वी विविध सूचनांचेही पालन करणे व इतर माहिती आवश्यक राहणार आहे. लसीकरणासाठी आल्यानंतर नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नेत्रालयातर्फे सांगण्यात आले.