खेडीढोक, ता. पारोळा : राजवड आदर्श गाव येथील गजानन माध्यमिक विद्यालय येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन दि. २९ मे रोजी शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयोजित करण्यात आले होते.
या लसीकरण शिबिराचा लाभ राजवड, दगडी सबगव्हाण, खेडीढोक व परिसरातील १६५ नागरिकांनी घेतला. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रांजली पाटील, पारोळा, शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनय गायकवाड, श्यामकांत पाटील, औषध निर्माण अधिकारी रवीद्र शिंपी, आरोग्य सहायक परेश जोशी, हर्षल पाटील, अनिल पाटील, मनोहर चौधरी, आरोग्य सेवक एस. बी. शेख, पी. जी. साळुंखे, आरोग्य सेविका विकास पाटील व जी. बी. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. कोरोना लसीकरण शिबिरास आमदार साहेबराव पाटील, सरपंच हरी नामदेव पाटील, ग्रामसेवक विवेकानंद पाटील, लोटन देसले, अशोक पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, मधुकर पाटील, मुरलीधर पाटील, नीळकंठा पिन्शटू मास्तर पाटील, अमोल पाटील, नीलेश सूर्यवंशी, राकेश पाटील यांचे सहकार्य लाभले.