जळगाव : शहर वृत्तपत्र विक्रेत्याबंधूंच्या सुरक्षिततेसाठी विक्रेता मंडळ, लोकमत व रेडक्रॉस सोसायटी यांच्या पुढाकाराने बुधवारी शहर वृत्तपत्र विक्रेत्यांना लसीकरणाचे आयोजन करुन बुधवारी रेडक्रॉस सोसायटी येथे लस देण्यात आली. शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी, उपाध्यक्ष नितीन चौधरी, रवींद्र जोशी, गोपाळ चौधरी यांनी यासाठी आभार मानले आहे.
न्यूजपेपर प्रेसमध्ये सॅनिटाईज होतो व आम्ही देखील सॅनिटाईझर व मास्कचा वापर करुन पुरेपूर काळजी घेत आहोत आणि आता लस घेऊन सुरक्षित वाटत आहे, असे मनोगत वृत्तपत्र विक्रेता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते विजय कोतकर, हिरालाल टेकावडे, धीरज काळुंखे, महेश सोनार, प्रदीप वाणी, दिलीप वाणी, संजय चौधरी, रवींद्र गायकवाड, प्रकाश वराडे, सुरेंद्र मेहता, मिलिंद भावसार आदी उपस्थित होते.