शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांचे झाले द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 6:50 PM

रावेर : तालुक्यातील १८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली असून, कोरोना ...

ठळक मुद्देसावदा, विवरे बुद्रूक, चिनावल येथील आलेख चढताचसावदा व रावेर येथील दोन कोरोना बाधितांचा मृत्यूआजपर्यंत १२६ रूग्ण झाले कोरोनामुक्त

रावेर : तालुक्यातील १८ रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली असून, कोरोना बाधितांनी द्विशतक पार केले आहे. दरम्यान, सावदा व रावेर शहरातील दोन कोरोना बाधीत रुग्णांचा बुधवारी जळगाव येथे मृत्यू झाला असून, आजपर्यंत १२६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यातील सावदा शहरातील एकाच परिवारातील १३ वर्षे, २१ वर्षे, ५० वर्षे, ६१ वर्षे, ७५ वर्षे वयाच्या महिला व ४० वर्षे वयाचा पुरूष असे सहा जण, विवरे बुद्रूक येथील ३७ व ३९ वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय महिला व आणखी दोन महिला असे पाच जण, चिनावल येथील चार जण तर रावेर शहरातील श्री स्वामी समर्थनगर, कोचूर, रसलपूर व बक्षीपूर येथील प्रत्येकी एकेक जण असे १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता २०४ वर पोहोचली असून, कोरोना बाधितांनी आता द्विशतक पार केले आहे, अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलीदरम्यान, बुधवारी सावदा शहरातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू जळगावी कोरोना रुग्णालयात झाल्याने त्यांचे अंत्यसंस्कार जळगाव येथेच करण्यात आले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात औषधोपचार घेत असलेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महिलेचा मृत्यू झाला. या कोरोना बाधित मृत महिलेवर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत चार जणांनी पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार केले.दरम्यान, रावेर न.पा.कडून चार पीपीई किटचा संच पुरवण्याखेरीज कोरोना बाधीत मयतावरील अंत्यसंस्कारप्रसंगी न.पा. व पोलीस विभागाकडून कोणीही जबाबदारी प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात न.पा. मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, तालुक्यातील आजपर्यंत १२६ कोरोना बाधीत रुग्णांंची कोरोना मुक्त झाल्याने सुटका करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर