जळगाव : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात शिरकाव केला आहे़ मात्र, अद्यापही अनेक बड्या गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखून धरले आहेत़ जिल्ह्यातील छोटी- मोठी ११११ गावे कोरोनापासून आतापर्यंत दूर आहेत़ मास्क बंधनकारक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, बाहेरून आलेल्यांना सक्तिचे क्वॉरंटाईन, प्रतिबंधात्मक औषधी व साहित्याचे वाटप, जनजागृती अशा विविध पातळ्यांवर योग्य पद्धतीने कामे करून या गावांनी कोरोनाला रोखून धरले आहे.
जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा तालुक्यांमध्ये कोरोनाने धडक दिली़ यात जळगाव शहरापासून सुरूवात होऊन अमळनेर, भुसावळ, चोपडा, पाचोरा असे क्रमाने रुग्ण आढळून आले व अखेर मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला़ धानोरा़ ता़ चोपडा या १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावानेही कोरोनला चार महिन्यांपर्यंत रोखून धरले होते़ मात्र, दोन दिवसांपूर्वीच या गावात रुग्ण आढळून आले़ आरोग्य विभागाकडून सर्वच गावांमध्ये सर्वच पातळ्यांवर उपाययोजना राबविल्या जात आहे़ ज्या गावांमध्ये कोरोना नाही, त्या गावांमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्याही कमी असेल असेही एक समिकरण मांडले जात आहे़ मात्र, आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवून बाहेर जाणाऱ्यांना हटकले, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडू नका, असे प्रबोधन हे अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे कोरोनापासून लांब असलेल्या या गावांच्या सरपंचानी ‘लोकमत’ला सांगितले़ कोरोनाचा शिरकाव असला तरी अनेक मोठ्या गावांमध्ये सक्रीय रुग्ण शून्य असूनही गावे कोरोनामुक्त झालेली आहे़ यासह काही गावांमध्ये १ किंवा २ रुग्णांवर बे्रक लागल्याने दिलासा मिळाला आहे़ अमळनेर तालुकयातील मुंगसे गावात जिल्ह्यातील दुसरा रुग्ण आढळून आला़ मात्र, या गावातही कोरोना नियंत्रणात राहिला़ भुसावळ तालुक्यातील वराडसीम या मोठ्या गावतही कोरोनाला अटकाव होता़ मात्र, काहीच दिवसांपूर्वी या ठिकाणी रुग्ण आढळून आला़ आधीची चार महिने हे गाव कोरोनापासून दूर होते़ कोरोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन करण्यात येते, अनेक गावांमध्ये हे नियम अतिशय सक्तिने पाळले जातात, असेही चित्र आहे़ यात ग्रा.प.ंची भूमिका महत्त्वाची ठरते.आरोग्य केंद्राची भूमिका महत्त्वाचीगावांमध्ये बाहेरून आलेल्यांना शाळा, किंवा समाजमंदिरामध्ये क्वारंटाईन केले जात होते़ या सर्वांवर लक्ष ठेवणे, लक्षणे असलेल्यांना वेगळे ठेवणे, २८ दिवस त्यांचा पाठपुरावा करणे आदी बाबी आरोग्य केंद्रांमार्फत झाल्या़ नॉन कोविडसाठीही या केंद्राची महत्त्वाची भूमिका राहिली.आशा वर्कर्सने पिंजून काढला जिल्हाजिल्हाभरात सर्व्हेक्षणाची प्रमुख जबाबदारी ही आरोग्य कर्मचाºयाची तर आहेच मात्र, त्यांच्या हाताला हात देत आशा वर्कर्सने यात मोलाची भूमिका बजावली आहे़ ज्या गावात कोरोना नाहीत त्या गावातही मागर्दशक सूचनांनुसार सर्व्हेक्षण करण्यात आले़ ५० वर्षांवरील व्यक्तिंचा नियमित पाठपुरावा होता.