शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सुरक्षित मुक्ताईनगरवर पुन्हा 'कोरोना'चे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:35 PM

सुरक्षित 'मुक्ताईनगर'वर पुन्हा 'कोरोना'चे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देभुसावळहून मुक्ताईनगरला आलेला तो मयत निघाला पॉझिटिव्हमुक्ताईनगरवासीयांमध्ये चिंता

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ येथून मुक्ताईनगर येथे आलेला रुग्ण जळगाव येथे हलविला असता त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यू पश्चात घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी सुरक्षित 'मुक्ताईनगर'वर पुन्हा 'कोरोना'चे सावट पसरले आहे.तब्बल दोन महिन्यापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक जीवापाड प्रयत्न करीत कोरोनापासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण करीत तालुका कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांना आज खीळ बसली आहे.भुसावळ येथील डी.एल.हायस्कूल फालकनगर परिसरात वास्तव्यस असलेला ५३ वर्षीय इसम तब्बेत अस्वस्थ वाटत असल्याने व भुसावळ येथील दवाखाने बंद असल्याने तपासणीसाठी १४ रोजी मुक्ताईनगर येथील सिड फार्म पॅरिसरात नातेवाईकाकडे आलेला होता. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी त्याची शहरातील दोन खासगी डॉक्टरांकडे तपासणी झाली. रुग्णाला त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच त्या डॉक्टरांनी त्याला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथून त्या इसमास जळगावी हलविण्यात आले. १५ मे रोजी रात्री तो मयत झाला. सदर रुग्णाचा कोविड तपासणी अहवाल १८ रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.दोघा डॉक्टरांसोबतच चौघे नातेवाईक क्वारांटाईनदरम्यान, या प्रकरणात खबरदारी म्हणून १६ रोजी मुक्ताईनगर शहरातील ते दोघे खाजगी डॉक्टरांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तो ज्या ठिकाणी मुक्कामी होता त्या ठिकाणच्या चौघा नातेवाईकांनादेखील मुक्ताईनगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कोविड सेंटरमधील चौघांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.चौघांच्या अहवालाची प्रतीक्षादरम्यान, कोरोनामुळे दगावलेला रुग्ण भुसावळ येथील असल्याने तूर्त दिलासा आहे. मात्र त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल येईपर्यंत तरी शहरावर कोरोनाचे सावट कायम आहे.मयताचा मुलगा डॉक्टरमयत रुग्णाचा मुलगा डॉक्टर असून, पुणे येथील प्रसिद्ध रुग्णालयात सेवा बजावत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर