शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

यंदाच्या रमजानवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:31 AM

Social (सय्यद लियाकत /मोहन सारस्वत) जामनेर , जि. जळगाव : इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानले गेलेल्या रमजान पर्वास शनिवारपासून ...

Social(सय्यद लियाकत /मोहन सारस्वत)जामनेर, जि. जळगाव : इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानले गेलेल्या रमजान पर्वास शनिवारपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षीदेखील मे महिन्यात रमजानचा महिना आला होता. यंदा रमजानवर कोरोनाचे सावट असून सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे असल्याने मशिदीत नमाज पठाण न करता दिवसभरातील सर्व नमाज घरातच करण्याची तयारी मुस्लिम बांधवानी केली आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्यात मशिदीत न जात घरातच नमाज पठण करण्याची ही आयुष्यातील पहिलीच वेळ असल्याचे समाजातील वयोवृद्ध सांगतात.रमजानमध्ये ३० दिवसांचे रोजे पाळले जातात. सकाळी चार वाजेपूर्वी काहीतरी थोडेफार खाऊन उपवासाला सुरुवात केली जाते. दिवसभर पाण्याचा घोटही ने घेता सायंकाळी सात वाजता उपवास म्हणजे रोजे सोडले जातात. सात वर्षाच्या बालकापासून तर आबाल वृद्धापर्यंत सर्वच जण रमजान मध्ये रोजे ठेवतात.रमजान पर्वात मुस्लिम बांधव दिवसात पाच वेळेस नमाज पठाण करतात. त्या अशाप्रकारे: सकाळी ५ वाजता फजर, दुपारी दीड वाजता जोहर, सव्वा पाच वाजता असर, सायंकाळी सात वाजता मगरीब, रात्री साडेआठ वाजता इशाह ,यानंतरतराबीच्या नमाजला मोठे महत्व आहे. सर्व नमाज मशिदीत केल्या जातात. मात्र यंदा जगावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाच्या आदेशानुसार धर्मगुरूंनी घेतलेल्या निर्णयानुसार नमाज पठाण घरीच करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.इस्लाम धर्मात पाच फर्ज महत्वाचे मानले गेले आहे. त्यात कलमा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. यातील नमाज, रोजा व जकात हे तीनही रमजानमध्ये येत असल्याने रमजान ला विशेष महत्व आहे. रमजान पर्वात घराघरात मुस्लिम बांधव कुराणाचे वाचन करतात.रमजानमध्ये या गोष्टी व्यर्ज मानले गेले आहे : खोटे बोलणे, चोरी करणे, मद्य प्रश्न करणे व जुगार खेळणे.रमजानचे रोजे सोडण्यासाठी सायंकाळी बाजारात विविध खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी बाजार भरतो व मुस्लिम बांधव मोठी गर्दी करतात. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून सुरक्षित अंतर ठेवत बाजार भरविण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.रमजानवर यंदा महागाईचे सावटकोरोनामुळे सर्वत्र लोकडाऊन आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, मजुरांच्या हाताला काम नाही. रोजच्या कमाईवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या गोरगरीब व कष्टकरी मुस्लिम बांधवाना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच पेंडखजूर, खारीक,खोबरा, काजू, बदाम, चारोळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मालेगाव व मलकापूर येथे शेवई बनविण्याचे कारखाने आहेत मात्र यंदा शेवई येत नसल्याने यावेळी रमजान महिन्यात शेवई पाहायलासुध्दा मिळत नाही .मशिदी दिसणार सुन्यासुन्या..यंदा रमज़ान महिन्यात लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच मशिदी सुन्यासुन्या दिसत आहे नाहीतर रमज़ान येण्यापूर्वीच मशिदीला रंगरंगोटी व रोशनाई केली जात असते. त्यामुळे प्रत्येक मशिदीला वेगळच स्वरुप असतो मात्र यंदा सर्व मशिदी सुन्यासुन्या दिसत आहे.छोटे व्यसायिकवर उपासमारीची वेळरमज़ान महिन्यामधे उपवास सोडण्यासाठी काही छोटे व्यसायिक खाद्यपदार्थ बनवतात. त्यामधे मूंग भजे, मूंगाचे वडे सह आदी खाद्यपदार्थ बनवतात मात्र यंदा खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले असून त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर