शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जळगावात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 1:00 PM

जळगाव : जळगावात शनिवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. येथील एका ४९ वर्षीय इसमाला कोरोना झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य ...

जळगाव : जळगावात शनिवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. येथील एका ४९ वर्षीय इसमाला कोरोना झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.जळगावात राहणारा हा इसम दोन दिवसापूर्वीच मुंबईहून आला आहे. मुंबईत तो एका चारचाकीवर चालक म्हणून काम करतो. घशात त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तो काही दिवस दुबई येथे होता, अशी चर्चा आहे.जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी तीन जण संशयित म्हणून दाखल झाले होते. त्यात या ४९ वर्षीय इसमाचाही समावेश होता. शुक्रवारी दाखल झालेल्या उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण सापडल्याने जळगावात मोठीच खळबळ उडाली आहे.सील केलेल्या कक्षात उपचारदरम्यान, या कोरोनाग्रस्त रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्षात पॉझिटीव्ह रुग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु आहेत. हा कक्ष पूर्णपणे सील करण्यात आला आहे.पॉझीटीव्ह असलेला हा रुग्ण जळगावातील मेहरुण परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे हा भाग सॅनेटाईज करण्यात येईल. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही १४ दिवस कोरोना कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येईल.- एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव.पॉझीटीव्ह अहवाल आलेला हा रुग्ण मुंबईहून परतला आहे. त्याची आणखी माहिती घेतली जात आहे.- डॉ. भास्कर खैरे, डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. जळगाव.