शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

माजी नगरसेविकेसह पतीही कोरोनाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:59 AM

जळगाव : अयोध्यानगरातील एक माजी नगरसेविका व त्यांचे पती या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ दोघांनाही डॉ़ ...

जळगाव : अयोध्यानगरातील एक माजी नगरसेविका व त्यांचे पती या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ दोघांनाही डॉ़ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सलग दोन दिवसात या दोघांचा मृत्यू झाला़ दरम्यान, अयोध्यानगरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून गुरूवारी पुन्हा दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत़ यासह शहरात गुरुवारी नव्या ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या ११९९ वर पोहचली आहे़शहरात कोरोनाचा संसर्ग मात्र त्याच झपाट्याने वाढत आहे़ शिवाजीनगरात उद्रेक कायम असून गुरूवारी सात रुग्ण रुग्ण आढळले.अयोध्यानगरातील माजी नगरसेविका व त्यांच्या पतीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर व त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते़ यात पतीचा ६ जुलै तर माजी नगरसेविकेचा ७ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे़या भागात आढळले रुग्णशिवाजी नगर ७, निवृत्तीनगर ५, श्रीराम नगर ४, सम्राट कॉलनी ३, अयोध्यानगर २, शनिपेठ २, इंद्रप्रस्थनगर, आंबेडकर नगर, भुरे मामलेदार प्लॉट, तांबापुरा, गेंदालाल मील, शिवशक्तीनगर, जोशी कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, समाधान नगर, पिंप्राळा, विवेकानंद नगर - २ गणेश कॉलनी, विद्युत कॉलनी, एमआयडीसी, एलआयसी कॉलनी, शंकरराव नगर, खासगी रुग्णालय बीएसएनएल आॅफिजजवळ, भिकमचंद जैन नगर, भारत नगर, मास्टर कॉलनी, कांचननगर, गणेशवाडी २, सुप्रिम कॉलनी, खासगी रुग्णालय जिल्हापेठ, नूतन वर्षा कॉलनी, कोळीपेठ, ओम साई पोलीस कॉलनी, गुरूदत्तनगर खोटेनगर, टीबी रूग्णालयाजवळ, महावीर हौसिंग सोसायटी, आदर्शनगर, दिनकर नगर, गिताईनगर, दादावाडी, राधेश्याम कॉलनी, हरिविठ्ठल जवळ आरएमएस कॉलनी, तुळशीनगर, वाघनगर, मेहरूण तलावाजवळ, आदर्श नगर या भागात रुग्ण आढळले.शहरातील दोघांसह आठ जणांचा मृत्यूजळगावत शहरातील एक ५६ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महिला यांच्यासह जामनेर २ व चाळीसगाव, पाचोरा, रावेर व पारोळा या तालुक्यातील प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव