शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

Coronavirus: ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 8:34 AM

Coronavirus: वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.

- संजय पाटीलअमळनेर - खासगी दवाखान्यात उपचार सुरू होऊन १९ दिवस उलटले होते. कोरोना मानगुटीवर बसला होता. वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले.राजकोरबाई यांना कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस उपचार करण्यात आले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दुसरीकडे खासगी दवाखान्यातील खर्च परवडत नव्हता. अखेर डॉक्टरांनी आशा सोडल्यावर नातेवाईकही हतबल झाले. त्यांचे भाऊ अशोक कोळी व इतरांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांना विनंती केली की, ऑक्सिजन लावा. महिनाभरपूर्वीची २६ एप्रिलची ती वेळ होती. या काळात अमळनेरात बेड उपलब्ध नव्हते, प्रशासनाने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेतले. राजकोरबाईचा ऑक्सिजन फक्त ३८ आणि एचआरसीटी स्कोअर १९ आणि उच्च रक्तदाब होता तो वेगळाच.रुग्णाला वाचविण्यासाठी डॉ. प्रकाश ताडे, डॉ. आशिष पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. मेहमूद, डॉ. तनुश्री फडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. सागर पाटील, डॉ. परेश पवार, डॉ. नरेंद्र पाटील, सर्व कर्मचारी आणि परिचारिकांनी अथक प्रयत्न केले. डॉक्टरांनी बायपॅप मशिन लावले. हाय फ्लो ऑक्सिजन लावला. हळूहळू त्या प्रतिसाद देऊ लागल्या.राजकोरबाईंनीही जगण्याची जिद्द ठेवली. ग्रामीण रुग्णालयात ३१ दिवसांनंतर महिलेचा ऑक्सिजन ९५ ते ९६ आला ५० दिवस कोरोनाशी लढून राजकोरबाई घरी परतल्या. सर्वांनी गेटवर येऊन त्यांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटुंबीयांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव