जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी शहराच्या दौºयावर आले असता, त्यांनी कोविड रुग्णालयाला भेट देऊन कोरोनाबाबत जिल्ह्याची स्थिती जाणून घेतली. या दौºयात भाजपाची सत्ता असलेल्या महानगरपालिकेच्या बाबतीत महापौर, उपमहापौर व मनपाच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत काही चर्चा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या दौºयातून मनपाचे काही ठरावीक नगरसेवक वगळता इतर पदाधिकारी थोडे लांबच राहिले. हा दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने मनपा व शहरविषयक कोणतीही चर्चा होणार नसल्याचे आधीच ठरले होते, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाºयांनी दिली तर काहींनी या दौºयाबाबतची पूर्ण माहिती आम्हाला कळवली गेलीच नाही असेही सांगितले.मनपात भाजपची सत्ता आहे. मात्र, दोन वर्षांत सत्ताधाºयांमधील आपसी मतभेदांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेल्या निधीतून १२० कोटींचा निधी अद्याप खर्च करता आलेला नाही.यासह अनेक पदाधिकाºयांची संघटनेतील पदाधिकाºयांशी पटत नाही तर ५७ नगरसेवकांमध्ये चार ते पाच गटांमध्ये सत्ता विभागली गेल्याने अनेक कामांना ब्रेकदेखील लागत आहे.अशा पार्श्वभूमीवर फडणवीस भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांना मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, फडणवीस यांच्या दौºयात केवळ कोरोनावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पासेस् वितरणप्रमुख पदाधिकाºयांना पासेसदेखील वितरीत केले होते. मात्र, पासेस वितरित केले असले तरी सुरक्षित अंतरासाठी दूर राहण्याचाही सूचना देण्यात आली होती. तसेच आमदार सुरेश भोळे, फडणवीस यांच्याकडेदेखील संघटनेतील पदाधिकारी म्हणजेच महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, राजेंद्र घुगे-पाटील, नगरसेवक जितेंद्र मराठे होते तर महापौर भारती सोनवणे यांनी जैन हिल्सवर फडणवीस यांची भेट घेतली.हेतूपुरस्सर पदाधिकाºयांना ठेवले दूर ?सध्या सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच काही नगरसेवकांनी याबाबत आमदार गिरीश महाजन यांच्याकडेदेखील चर्चा केली होती. त्यातच फडणवीस यांनी नगरसेवकांची किंवा काही पदाधिकाºयांसोबत बैठक घेतली असती तर या नाराजी नाट्यावर चर्चा झाली असती. त्यामुळे पदाधिकाºयांना मुुद्दामहूनच फडणवीसांच्या दौºयापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. यासाठी सुरक्षित अंतराचा मुद्दा निर्माण होईल, असे कारण देत पदाधिकाºयांना दूर ठेवले असल्याची माहिती भाजपच्या काही नगरसेवकांनी दिली.विरोधी पक्षनेत्यांच्या दौºयाच्या वेळेस सर्व पदाधिकाºयांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच महापौरांनीही जैन हिल्स येथे विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली होती. सुरक्षित अंतरदेखील पाळणे गरजेचे होते. त्यामुळे काही नियम पाळावे लागले. कोरोनाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना दिल्या आहेत. नागरिकांना लागणाºया गरजा पूर्ण करण्यासोबत गरजंूना मदत करण्याचा सूचना दिल्या आहेत.-दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष, भाजप
फडणवीसांच्या दौऱ्यापासून मनपाचे पदाधिकारी राहिले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:58 AM