जामनेर : येथील अंजुमन हायस्कूल चा दहावी शाळेचा निकाल घसरल्याने उपनगराध्यक्ष, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला. परीक्षेस बसलेल्या १६२ पैकी ६८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. शाळेत काही शिक्षक विद्यार्थ्यांना पाय चेपायला लावतात डोक्यावरील केस काढायला लावतात असा आरोप यावेळी नगरसेवक रिझवान शेख यांनी केला.बहुतेक विद्यार्थी उर्दू, हिंदी, मराठी व इंगजी , विज्ञान या विषयात अनुत्तीर्ण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेच्या संस्था चालकाच्या वाद असून त्यामुळे शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्ल्क्ष होते असा आरोप करून, शिक्षकांनी वादात न पडत शिकविण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या लोकप्रतिनिधींनी मुख्याध्यापक शेख अजगर यांचेकडे केली. काही शिक्षक वर्गात मोबाईलवर लक्ष देतात व खाजगी व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते.उपनगराध्यक्ष अनिस शेख, नगरसेवक रिझवान शेख, नाजीम शेख, डॉ इम्तियाझ खान, खालील खान, फारूक मणियार, नूरु शेख, एल एस खान, जुबेर अली, आसिफ शेख, इम्रान खान, जाकीर खान, अनावर पेहलवान, इम्रान शेख यांचेसह पालक उपस्थित होते.
कमी लागलेल्या निकालाचा नगरसेवकांनी विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 6:49 PM