चोपडा : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शोभा देशमुख यांचे चिरंजीव प्रवीण देशमुख यांनी पालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी आत्माराम बाविस्कर यांना भ्रमणध्वनी वरून अरेरावी केल्याने १६ रोजी पालिकेच्या कर्मचाºयांनी सकाळी ११ वाजता पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पायºयांवर बसून घोषणाबाजी करीत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे.प्रवीण देशमुख यांनी १५ रोजी दुरध्वनीवरून आत्माराम बाविस्कर यांना अरेरावी करून शिवीगाळ केली होती. प्रवीण देशमुख यांनी पाटील गढी भागातील पथदिवे सुरू करण्याबाबत बाविस्करकडे १४ रोजी तोंडी तक्रार केली होती. त्यामुळे १५ रोजी पथदिव्यांचे काम करण्यासाठी बाविस्कर यांना प्रवीण देशमुख यांनी वायर टाकून पथदिवे सुरू करण्याचे सांगितले. तेव्हा बाविस्कर यांनी सर्व्हिस वायर उपलब्ध नसल्याने दोन दिवसात उपलब्ध झाल्यावर मी काम करून देईल, असे सांगितले. मात्र त्याचा राग येऊन नगरसेविका शोभा देशमुख यांचे चिरंजीव प्रवीण देशमुख यांनी अरेरावी, शिवीगाळ केली म्हणून आज पालिकेत भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून घटनेचा जाहीर निषेध केला व कायदेशीर कारवाई करण्याबाबत मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन दिले.याबाबत प्रवीण देशमुख यांनी सांगितले की मी कोणत्याही कर्मचाºयाला अरेरावी अथवा अपशब्द वापरला नाही. केवळ बदनामीसाठी असे कृत्य केले जात आहे, असे देशमुख यांचे म्हणणे आहे.
चोपडा येथे नगरसेविकापुत्राची कर्मचाऱ्याला अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:49 AM