ठळक मुद्दे‘एमआयएम’जवळ केवळ प्रक्षोभकपणामनपा निवडणुकीत आघाडीचा पर्याय खुला
जळगाव- देशात सर्वत्र प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्वत: राज्यकर्ते भ्रष्टाचारात अडकले आहेत. भ्रष्टाचारी कोणीही असो त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य सरकारमध्येही अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काहींना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचिटही दिली. परंतु हा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांची विशेष न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी केली. मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी ते येथे रविवारी जळगावात आले असता शासकीय विश्रामगृहात दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अध्यक्ष सैय्यद मोईन, प्रदेश सचिव अहमद हुसेन, कोअर कमेटी चेअरमन सादीक शेख, प्रदेश सहसचिव परवेज सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष रागीब अहमद, महानगराध्यक्ष सलीम इनामदार आदी उपस्थित होते. निवडणूक जाहीरनाम्यावर कोर्टाचे बंधन असावेमोदी यांनी जनतेला निवडणुकीत भरमसाठ आश्वासने दिलीत मात्र पूर्तता काहीच केली नाही. जनतेची एक प्रकारे फसवणूकच केली. हा प्रकार पाहता निवडणूक जाहीरनाम्यांवर कोर्टाचे बंधन असायला हवे. एखादा पक्ष सत्तेत आल्यावर त्याने दिलेली आश्वासने विशिष्ट मुदतीत पूर्ण झाली नाही तर ते सरकार बरखास्त केले पाहिजे, असे परखड मतही आझमी यांनी व्यक्त केले. मनपा निवडणुकीत आघाडीचा पर्याय खुलासमाजवादी पार्टी जळगाव महानगरपालिका निवडणूक पूर्ण शक्तीनिशी लढविणार आहे. स्वबळावर किमान 40 ते 50 जागा लढविण्याची आमची तयारी आहे. मात्र धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडीचा पर्यायही आम्ही खुला ठेवला आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते यास आमचे प्राधान्य राहणार आहे. इंग्लिश स्कूल व महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचाही प्रयत्न राहील, असेही अबू आझमी यांनी सांगितले. महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने रोजच नागरिकांचे बळी जात असल्याची टिकाही त्यांनी केली. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही उमेदवार देवू अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.मुस्लीम भागात साफसफाईकडे दुर्लक्षआझमी म्हणाले की, मुस्लीम समाजावर अधिक अन्याय होत असून जळगाव शहरातील मुस्लीम रहिवास असलेल्या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागात रोगराई अधिक आहे. मुंबईतही हाच अनुभव आहे. मुस्लीम भागात पोलीस चौकी असते पण साफसफाईची होत नाही.हिंदू आणि मुस्लीम यांच्यात भेदविविध मंदिरांसाठी सरकारकडून निधी दिला जातो. मात्र बिबी का मकबरा, हाजीअली या ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांसाठी अनेकदा मागणी करुनही सरकार निधी देत नाही, हा भेद होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ‘एमआयएम’जवळ केवळ प्रक्षोभकपणा‘एमआयएम’ने केवळ प्रक्षोभक भाषणे करुन लोकांना जवळ केले परंतु कार्य काहीच केले नाही. यामुळे आपण एमआयएम सोडून नुकताच समाजवादी पार्टीत प्रवेश केला असल्याची माहिती एमआयएमचे नेते व सपाचे कार्यकारी अध्यक्ष सैय्यद मोईन यांनी दिली. एमआयएम हा पक्ष केवळ धार्मिक भावनांचा आधार घेत पुढे आला आहे. पक्ष खूपच मर्यादीत स्वरुपात आहे. त्यामुळे उंदीर कितीही फुगला तरी तो हत्ती होणार नाही, असा टोलाही अबू आझमी यांनी एमआयएमला लगावला. न्यायालय आणि पोलीस कामात सरकारचा हस्तक्षेपदेशात महिलांवर क्रूरपणे अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. अशा बलात्का:यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे स्पष्ट मत अबू आझमी यांनी व्यक्त केले. दरम्यान पोलीस आणि न्यायालयीन कामकाजात सरकारचा हस्तक्षेप वाढत असून देशात कायदा आणि सुव्यवस्था ढेपाळली आहे. मुस्लीमांवर अन्याय होत आहेत. औरंगाबाद येथील दंगलीतील कारवाईबाबतही त्यांनी पक्षपात होत असल्याची नाराजी व्यक्त केली. मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींना सोडल्याबद्दलही त्यांनी आक्षेप नोंदवला. मोदी सरकारकडून मनमानी सुरु असून घटना बदलण्याचा डाव या सरकारचा आहे, परंतु असे होवू दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.अयोध्येत राममंदिर की मशीद..हे न्यायालयाला ठरवू द्याअयोध्येत राममंदिर बांधावे की मशीद हे न्यायालयाला ठरवू द्यावे. ते आम्हाला मान्य राहील. परंतु न्यायालयाचा निर्णय न घेता तेथे मंदिर बांधल्यास आमचा त्यास तीव्र विरोध राहील, असा इशाराही अबू आझमी यांनी दिला.भ्रष्ट मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 7:15 PM