कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : गेल्या महिनाभरापासून सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापसाच्या तयार झालेल्या कैऱ्या सडल्या आहेत. मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झालाच. त्यात पावसासोबतच्या वाºयामुळे मका आडवा झाला आहे. उडीद, मूग सडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून सरसकट कर्जमाफी, गेल्या वर्षीचा दुष्काळाचा निधी दिला. लाईट बिलांबाबतचा न घेतलेला निर्णय यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे.तालुक्यात एकूण ३४,७११ हेक्टर पेरणी क्षेत्र असून, कापूस १८, ४२७, कडधान्य ४,६००, तृणधान्य ७,४७०, गळीत धान्य ३,८४५ हेक्टर क्षेत्रात आहे. त्यात केळी व फळबाग शून्य एकर आहे. सततच्या पावसाने जमिनीतून पाणी झिरपत आहे. यामुळे काही शेतातील कापसाची झाडे कोलमडून पडली आहेत. कपाशीच्या एका झाडाला ३० ते ४० कैरी पक्की झालेली होती. ती सगळी सडून काळी पडली आहे. जमीन ओली असल्याने शेतात जाऊनही कैरी तोडतादेखील येत नाही. तोडून आणली तरी सूर्याचे दर्शन होत नसल्याने सुकवतादेखील येत नाही. सुकवला तरी हा कापूस कुणी व्यापारी घेणार नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे.मक्यावर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतातील मक्याची अर्ध्यावर कणसे या अळीने खाऊन टाकली आहेत, तर पावसासोबतच्या वाºयामुळे अनेक शेतातील मका आडवा झाला आहे. उडीद व मुगाच्या पक्क्या झालेल्या शेंगा सततच्या पावसामुळे तोडता आल्या नाहीत. त्यामुळे हे पीकसुद्धा वाया गेले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत, विमा कंपन्यांनी योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.सरसकट कर्जमाफीच्या घोषणेमुळे वि.का. संस्थेच्या सभासदांच्या थकबाकीचे प्रमाणात प्रचंड वाढले आहे. संस्था तोट्यात आहेत. दुष्काळी मदत नाही, यंदा तर सगळीच पिके सततच्या पावसाने वाया गेली आहेत. महसूल विभागाने पंचनामे ताबडतोब करावेत. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.-दीपक वाणी, चेअरमन, वि.का. सहकारी संस्था, कासोदा
दररोजच्या पावसाने कापूस सडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 7:22 PM
गेल्या महिनाभरापासून सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापसाच्या तयार झालेल्या कैऱ्या सडल्या आहेत.
ठळक मुद्देमका आडवा झाला शेतकरी हवालदिलसततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानजमीन ओली असल्याने शेतात जाऊनही कैरी तोडतादेखील येत नाही