अर्पण लोढावाकोद, ता.जामनेर, जि.जळगाव : यंदा अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शेतकरी या सूचनेकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.पुढील वर्षी करावा लागू शकतो सामनाबोंडअळी ही कपाशी पिकासाठी अत्यंत घातक आहे. कोणत्याही प्रकारची फवारणी केली तरी या अळीवर नियंत्रण मिळविणे कठीण आहे. ही अळी थेट बियाण्यातून कैरीपर्यंत संक्रमण करते. आता फरदड कपाशी शेतातून न काढल्यास ही अळी मातीतून पुन्हा पुढच्या पिकाच्या लागवडीच्या वेळी संक्रमण करण्याची शक्यता असते. शेतातील उभी फरदड कपाशी काढण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत. मात्र बहुतांश शेतकरी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.भाववाढीची अपेक्षायंदा सधन शेतकºयापासून तर सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पैशांच्या रेलचेलअभावी आर्थिक संकटाचा सामना करीत सुरवातीला मिळेल त्या भावाने कापूस विक्री केला. सद्य:स्थितीत कपाशीला पाच हजारावर भाव मिळेल या आशेनेदेखील फरदडमुळे तरी काहींना काही नुकसान भरून निघेल म्हणून शेतकरीवर्ग हे पीक घेण्यासाठी आतूर दिसत आहे.सर्वत्र कपाशी पीक मुख्य असल्याने लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या तरी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने पुढील उत्पन्न धोक्याचे ठरणार आहे. बोंडअळी असलेली फरदड कपाशी लगेच काढली गेली पाहिजे. थोड्याशा रकमेच्या मोहात न पडता ही कपाशी नष्ट करणे गरजेचे आहे. शासकीय कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ यांच्याकडून फरदड न घेण्याचा सल्ला शेतकरी बांधवाना दिला जात आहे.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअपेक्षेपेक्षा यंदा उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात अति पावसामुळे निम्म्यावर कपाशी वाया गेली. शेतात लावलेला मोठा खर्च पाहता सारखा तोटा सहन करावा लागत आहे. शेतात लावलेला काहीना काही खर्च निघेल या आशेपोटी फरदड घेण्याचा प्रयत्न करीत आहे.-लखन चव्हाण, शेतकरी, कुंभारी तांडा, ता.जामनेर
कापूस उत्पादक अडकले फरदडच्या मोहात, कृषी विभागाकडून मात्र ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 3:45 PM
अतिवृष्टीमुळे हातात आलेले पीक अक्षरश: वाया गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असताना, उत्पन्नात मोठी घट झाली. अशाही परिस्थितीत शेतात लागलेल्या खर्चाला हातभार लागावा या हेतूने फरदड घेण्याचा प्रयत्न काही शेतकरी वर्ग करीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना शेतातून फरदड काढून टाकण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ठळक मुद्देउत्पन्नाची घट भरून काढण्यासाठी सुरू आहे धडपडकृषी विभाग म्हणतो, आता फरदड न काढल्यास पुढील लागवडीच्या वेळी बोंडअळी संक्रमण करू शकते