जळगाव : शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली असली तरी व्यापा-यांकडून कापसाची प्रत तपासताना आडमुठेपणा दाखविला जातो. त्यामुळे ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. अशा कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यास शासनाने निश्चित केलेल्या ५ हजार ४५० या दरापेक्षा चांगला भाव शेतक-यांना मिळेल, अशी आशा शेतक-यांना लागून आहे.आॅक्टोबर महिन्यात शासनाकडून दरवर्षी कापूस खरेदी केंद्र सुरू होतात. यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पणन महासंघ किंवा सीसीआयकडून खान्देशात एकही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. व्यापा-यांकडून कापसाला प्रती क्विंटल ५२०० ते ५८०० इतका दर दिला जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना ४८०० ते ५४०० पर्यंतच्या दरानेच आपला माल विक्री करावा लागत आहे.व्यापाºयांकडून शेतक-यांच्या मालामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात. त्यातच दिवाळी जवळ असल्याने खरेदीसाठी शेतक-यांना पैशांची गरज असल्याने नाईलाजास्तव कमी दरात शेतक-यांना आपला माल व्यापा-यांना विक्री करावा लागत आहे. सीसीआयचे केंद्र सुरू होऊ नये म्हणून जिनिंग असोसिएशनकडून प्रयत्न सुरू असून, हे केंद्र सुरू झाल्यास व्यापा-यांना फटका बसेल म्हणून सीसीआयच्या केंद्रावर व्यापा-यांनी बहिष्कार टाकला असल्याचा आरोप शेतक-यांकडून केला जात आहे.जानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यतासध्या भारतातील मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारताकडून चीन, बांगलादेश या देशांमध्ये होणारी निर्यात देखील कमी झाली असल्याने कापसाचे दर स्थिर आहेत. मात्र, जानेवारीपर्यंत मालाचा तुटवडा कमी होऊन निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीतच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता ललित भुरट यांनी व्यक्त केली.दुष्काळात १३ महिनायंदा दुष्काळामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकºयांना बसतच आहे. त्यातच शासनाची उदासीनता व व्यापा-यांच्या आडमुठेपणामुळे शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या कापूस वेचणी देखील सुरू आहे. दिवाळीनंतर कापसाचे दर वाढतात, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच कापूस विक्रीसाठी शेतकरी येतील, अशी शक्यता आहे.
जळगावात कापूस उत्पादकांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 3:51 PM
शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास चालढकलखान्देशात फक्त ७ लाख क्विंटल कापसाची खरेदीजानेवारीपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता९० टक्के माल शेतकऱ्यांचा घरातच