शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शासनाचे आदेश नसताना कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता सीसीआयने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव, सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिलीभगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शासनाने ५७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा चांगला माल विक्रीसाठी येऊ लागल्यानंतर आता कापसाची प्रत खालावली असल्याचे कारण देत हमीभावात तब्बल ११५ रुपयांची घट केली आहे. तसेच आर्द्रतेचे कारण देत सीसीआयच्या केंद्रावर कापसावर कट्टी लावण्याचे धोरण देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून सीसीआयच्या मनमानी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

मंगळवारी शेतकरी आपला माल घेऊन आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर माल घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सीसीआयने भावात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच ग्रेड लावून कट्टी लावल्यास सीसीआय विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे भावात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच दर कमी केले, असा आरोप आव्हाणे येथील प्रगतिशील शेतकरी भगवान श्रीधर चौधरी यांनी केला.

शेतकऱ्यांची फिरवा-फिरव

जळगाव शहर व तालुक्यासाठी आव्हाणे येथील तीन जिनिंगमध्ये सीसीआयकडून माल खरेदी केला जात आहे. मात्र, एक दिवस एका जिनिंगमध्ये तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेतला जातो. अशाप्रकारे रोटेशन सिस्टीमने मालाची खरेदी केली जात आहे. मात्र, सीसीआयकडून हे निर्णय ऐनवेळी बदलले जात असल्याने शेतकऱ्यांना एका जिनिंगकडून दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेऊन फिरावे लागत आहे. अनेक शेतकरी तीन दिवसांपासून मालाने भरून आणलेल्या ट्रकसह रांगेत उभे राहत आहेत.

व्यापाऱ्यांना प्राधान्य, शेतकरी रांगेत

सीसीआयच्या केंद्रावर देखील व्यापाऱ्यांचे काही दलाल सक्रिय झाले असून, व्यापाऱ्यांच्या मालाला टोकण देऊन त्यांचा क्रमांक पुढे लावला जात आहे. यामुळे सीसीआयच्या केंद्रावर मंगळवारी काही प्रमाणात गोंधळदेखील झाला. शेतकरी प्रामाणिकपणे रांगेत उभा राहून आपला माल विक्रीसाठी आणत असताना जिनिंगमध्ये त्याच्याआधी व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करू नका

सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच भावात ११५ रुपये कमी केल्याने बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे. तसेच हमीभावात घट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेऊन खुलासा सादर करण्याच्या सूचना बाजार समितीने सीसीआय प्रशासनाला दिल्या आहेत.