उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बोदवड येथे तर बुधवारी कापसाचे बाजारात दिवसभरात तीन भाव करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग चकीत झाला आहे.यावर्षी सर्वत्र भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे कापूस ,ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग आदी सर्वच मालांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. कापसाचे खासगी जिनिंगमध्ये खरेदीसाठी जिनिंग मालकांनी दसºयाचा मुहूर्त साधला व काही ठिकाणी सहा हजार तर काही ठिकाणी सात हजार १०० रुपये भाव देऊन काटा पूजन केले. जिल्ह्यात मात्र गेल्या २०-२५ दिवसांपासून पाच हजार ८०० ते सहा हजार रुपयांपर्यंत खरेदी सुरू आहे. मंगळवारपासून हे भाव अचानक कोसळले आहे. बोदवड येथे बुधवारी दिवसभरात तीन भाव दिसून आले. सकाळी पाच हजार ७०० रुपये दुपारी पाच हजार ६०० तर सायंकाळी पाच हजार ५०० रुपये भावाने कापूस खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकरी आश्चर्यचकीत झाला आहे. शेतकºयांनी सकाळी दुकानदारांना भ्रमणध्वनीवरून भाव विचारला असता, पाच हजार ७०० रुपये भाव सांगण्यात आला. काही शेतकºयांनी किरकोळ कापूस विक्रीसाठी बाजारात आणला. मात्र त्यांना १०० रुपयांनी भाव कमी झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी तर पुन्हा १०० रुपयांनी भाव कमी करण्यात आले. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. तथापि, दिवाळी तोंडावर असल्यामुळे शेतकºयांना कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तर व्यापाºयांनी डाव साधला नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे . मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा हा भाव अधिक असल्यामुळे शेतकरीवर्गाला तूर्त समाधान मानावे लागत आहे.दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही कपाशी, ज्वारी, मका खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाने ज्वारीला दोन हजार ४३० रुपये तर मक्याला एक हजार ७०० रुपये भाव घोषित केला आहे. खाजगी बाजारपेठेत मात्र शेतकºयांना ज्वारीही अवघ्या एक हजार ६०० ते एक हजार ७०० रुपये भावात विकावी लागत आहे. ज्वारी महिनाभरापूर्वीच शेतकºयांच्या घरात आली आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र खरेदी केंद्र्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान, शेतकºयांची ज्वारी विकल्यानंतर तर खरेदी केंद्र्र सुरू होणार नाही ना, असा प्रश्न शेतकरीवर्गातून उपस्थित करण्यात आला आहे.सरकीचे भाव दोन दिवसापूर्वी दोन हजार पाचशे रुपये होते. ते भाव आता दोन हजार शंभरावर आले आहे. त्यात कापसाची आवक वाढली आहे. त्यामुळे कपाशीचे भाव कमी झाले असल्याची माहिती बोदवड येथील जिनिंग मालक अरविंद बरडिया यांनी दिली.
ऐन दिवाळीत कापसाचे भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:27 PM
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भावाने माल विकावा लागत आहे. व्यापाºयांकडून होणाºया लुटीमुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
ठळक मुद्देसरकीचे भाव कमी झाल्याने भाव कोसळलेबोदवड येथे पांढºया सोन्याचे दिवसभरात झाले तीन भावखरेदी केंद्रास विलंब : ज्वारी व मकाही मातीमोलशेतकरीवर्गातून व्यक्त होतोय संताप