लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : आठवडाभर बंद असलेली सीसीआय केंद्रावरील कपाशी नोंदणी सोमवारी पुन्हा सुरु करण्यात आली. मंगळवारी दुपारपर्यंत तळेगाव व भोरस यादोन्ही केंद्रांवर ९००हून अधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशी विक्रीसाठी नोंदणी केल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीष पाटील यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात कपाशीची खरेदी झाल्याने भोरस आणि तळेगाव केंद्रावर ढीग लागले आहे. प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याने जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन सीसीआयने दोन्ही केंद्रांवरील नोंदणी सात दिवसांसाठी थांबावली. ही नोंदणी सोमवारी नव्याने सुरु करण्यात आली. याअगोदर १४ अखेर ४६ हजार क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे.
मोजणी सुरु
भोरस येथील केंद्रावर शंभर तर तळेगाव केंद्रावर ५० अशा दिडशे वाहनांमधील कापूस २३ व २४ रोजी मोजला जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी कळविले आहे. त्यांनीच वाहने केंद्रांवर आणावी. शेतकऱ्यांना अतिरिक्त भूर्दंड बसू नये. याची खबरदारी घेण्यात आली आहे.