हरताळा, ता. मुक्ताईनगर : यंदाच्या अति पावसानंतर दूषित हवामानामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. परिसरात अति पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना उरले सुरलेले कपाशीचे पीकही आता अळ्या पडल्याने वाया गेल्यासारखे आहे.कपाशीच्या कैरीला बोंड अळीमुळे पूर्ण कीड लागली आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे, अशी व्यथा प्रदीप काळे, सुनील तायडे, संजय ठाकूर,तसेच विकसनशील शेतकरी कृषी मित्र आनंदराव देशमुख यांनी मांडली आहे.यंदा सुरुवातीपासूनच आस्मानी संकटाने शेतकऱ्याची पाठ सोडली नाही. अति पावसाने हिरवा गार झालेल्या कापसाला शेवटी फुलपात्या आल्या होत्या मात्र काही कैºया लागल्यावर त्यातही बोंड आळ्या तयार झाल्याने ९० टक्के कापूस पुन्हा वाया गेला आहे. शेवटी तरी बहरलेल्या कापसाचा फायदा शेतकºयाला होईल अशी अपेक्षा होती मात्र शेवटच्या बहारने देखील शेतकºयाला तारले नसल्याची स्थिती या परिसरात आहे.नुकसानीचे पंचनामे शासनाने करून त्याची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांदाही शेतातच सडल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, मका घरात येणपूर्वीच सडला होता. यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली असून दैंनंदिन गरजा भागविण्याचा प्रश्नही त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.शेवटी कापसाला चांगला बहार लागलेला असताना कैºयांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पुढील हंगामातही बोंड अळीची लागण जास्त होऊ शकते. शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले असून आर्थिक प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला आहे. शासनाने पिकविमा मंजूर करावा. पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी.-आनंदराव देशमुख, शेतकरी, हरताळा ता. मुक्ताईनगरबोंडअळीवर नियंत्रण करण्यासाठी शेतकºयांनी आता नीम तेल हे पंधराशे पीपीएम प्रति मिल प्रमाणे फवारणी करावी. शेतकºयांनी आता त्याच ठिकाणी दुबार पीक घेऊ नये , फवारणी करताना नाकातोंडात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर
बोंडअळीने लावली कापसाची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 10:02 PM