जळगाव : मनपाचे स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली, त्यात नगरसेवक व स्थायी समिती सदस्यांना विश्वासात घेतले नाही, या मुद्यावरून सोमवारी भाजपा कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत चांगलाच गोंधळ झाला. भाजपाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी याबाबत स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांना जाब विचारला असता दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवारी सायंकाळी ६ वाजता बळीराम पेठ भागातील भाजपा कार्यालयात आमदार सुरेश भोळे यांनी भाजपा नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, भाजपाचे गटनेते भगत बालानी, कैलास सोनवणे यांच्यासह एकूण ३२ नगरसेवक उपस्थित होते. सुरुवातीलाच नवनाथ दारकुंडे यांनी स्थायी समितीी सभापती जितेंद्र मराठे यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीवर आक्षेप घेतला. स्थायी समिती सभापतींना बैठक घेण्याचा अधिकार आहे. मात्र, हा निर्णय घेताना त्यांनी नगरसेवकांना विश्वासात का घेतले नाही ? असा प्रश्न दारकुंडे यांनी उपस्थित केला.इतर नगरसेवकांनी देखील व्यक्त केली नाराजीदारकुंडे यांच्यासह किशोर बाविस्कर, किशोर चौधरी व सचिन पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त करत. आमच्याही समस्या होत्या त्या समस्यांचे निराकरण होणे गरजेचे होते. मात्र, सभापतींनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर जितेंद्र मराठे यांनी सभापती म्हणून आपणास बैठक घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात जर सभापती म्हणून बैठक घ्यायची नसेल तर तशी बैठक घेण्यात येणार नसल्याचे सांगितले. या वादा दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थीकरण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.नगरसेवकांनी मांडला समस्यांचा पाढाया बैठकीत नगरसेवकाने आपल्या प्रभागात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावर समस्यांचा पाढा मांडला. शहरात पाणीटंचाईवर मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पाणी टंचाईबाबत एप्रिल महिन्यातच बैठक घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना ही बैठक घेण्यात न आल्यानेही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर आमदार सुरेश भोळे यांनी लवकरच पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत मनपाची विशेष सभा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही आमदार भोळे यांनी दिली.आमदार निधी का दिला जात नाही ? - नगरसेवकांचा प्रश्नआमदार भोळे यांनी या बैठकीत मनपा आयुक्तांशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले. मात्र, ही बैठक संपल्यानंतर दहा ते बारा नगरसेवकांनी आमदार भोळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. मनपाकडून निधीची वाट पाहण्याऐवजी आमदारांनी आपल्या निधीतून काही समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली. तसेच आमदार आपल्या निधीचा वापर का करत नाही ? असा प्रश्न नगरसेवकांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी असमर्थता व्यक्त केली.कोणाची नाराजी व्हावी, हा उद्देश या बैठकीचा नव्हता. काही नगरसेवकांच्या तोंडी व लेखी तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच वृत्तपत्रांमधून देखील काही समस्या आढळून आल्या होत्या. त्यामुळेच स्थायी समिती सभापती म्हणून आपण ही बैठक घेतली. तसेच या बैठकीत केवळ एकाच प्रभागातील समस्यांचा विचार न करता सर्व शहराच्या दृष्टीनेच समस्यांबाबत अधिकाऱ्यांक डून जाब विचारण्यात आला.-जितेंद्र मराठे, सभापती, स्थायी समितीबैैठकीदरम्यान कोणताही वाद झाला नाही. बैठकीनंतर झाला असेल तर त्याबाबत माहिती नाही. ही बैठक पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत घेण्यात आली होती. लवकरच शहराच्या पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत मनपाची विशेष महासभा घेण्याचे नियोजन आहे.-सुरेश भोळे, आमदार
नगरसेवक व स्थायी समिती सभापतींमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:15 PM