जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून या दोन्ही मतदार संघाची मतमोजणी गुरुवार, २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून जळगाव येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. दोन्ही मतदार संघातील सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
Lok Sabha Election 2019 : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी वखार महामंडळाच्या गोदामात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:26 PM