जळगाव : शनिपेठेतील विक्रेत्यांना गोलाणीत जाण्यासंदर्भात मनपाने दिलेल्या अल्टिमेटम प्रकरणी हॉकर्सतर्फे न्यायालयात दाखल याचिकेत आज नव्याने अर्ज दाखल करून न्यायालय समिती नेमुन समितीकडून अहवाल घ्यावा अशी मागणी केली आहे. शनिपेठ ते सुभाष चौक भागात शेकडो भाजी विक्रेते बसलेले असतात. या मार्केटमध्ये प्रचंड असुविधा असल्याने विक्रत्यांकडून तेथे जाण्यास विरोध आहे. सोमवारी नारायण बारी व इतरांनी न्यायलयात यापूर्वी दाखल याचिकेवर अर्ज दाखल केला. याप्रश्नी महापालिकेतर्फे या अर्जाची प्रत न्यायालयाकडून मागवून घेतली. न्यायालयाने यात १६ सप्टेंबर ही तारीख दिली आहे. मनपातर्फे अँड. केतन ढाके हे काम पहात आहेत.
मार्केटमधील ओट्यांची स्थिती, बसण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, पार्किंग व्यवस्थेची पहाणी करण्यासाठी न्यायालयाने एक न्यायालयीन समिती नेमावी व या समितीने आपला अहवाल न्यायालयास सादर करावा.