भुसावळ, जि़ जळगाव, दि.9 - शहरातील वैतागवाडी भागातील अवैध व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून अटक केलेल्या 19 आंबटशौकीन आरोपींचा मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला़ 24 एप्रिल 2017 पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती़ 31 पीडीत महिलांची सुटका करण्यात आली होती तर 20 ग्राहकांसह तीन मालकिणी व चार दलालांविरुद्ध पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
अटकेतील आरोपी हे भुसावळसह बुलढाणा, ब:हाणपूर, जळगाव, जोगळी फाईल, सोयगाव भागातील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल़े
24 एप्रिल 2017 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने धाड टाकून कारवाई केली होती़ 20 आंबटशौकीन ग्राहकांना त्यावेळी अटक करण्यात आल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती़ मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़क़ेकुलकर्णी यांच्या समोर त्यांच्या जामीन अर्जावर कामकाज झाल़े सरकार पक्षातर्फे अॅड़संजय सोनवणे यांनी युक्तीवाद केला़