लसीकरणासाठी गावात दवंडी देऊन नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला शिरसमणीकरांनी चांगला प्रतिसाद दिला व पहिल्याच दिवशी १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी सरपंच रोहिदास पाटील व समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन यांनी पाठपुरावा केला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी सरपंच रोहिदास पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील, विकासोचे उपाध्यक्ष गोपाळ रावसाहेब पाटील, जिभाऊ महाजन, समाधान पाटील, मुरलीधर माळी, भैया पाटील, शेखर महाजन, मनोहर भिल उपस्थित होते.
लसीकरणासाठी मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, सुनील सूर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, कुवर राजपूत, कमलेश सोनवणे, व्ही. टी. गढरी, आरोग्यसेवक अहिरे उपस्थित होते.