वाघडू (ता. चाळीसगाव) : वाघडू गावी कोविड लसीकरण सुरू झाले आहे. सरपंच राहुल सोनवणे, उपसरपंच देवेंद्र पाटील, राहुल पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने आरोग्य अधिकारी डॉ. डी. के. लांडे यांची भेट घेतली व वाघडू या गावासाठी जास्तीत जास्त डोस उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली. या मागणीचा विचार करून तालुकास्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळीअंतर्गत हातले उपकेंद्र येथील वाघडू गावात आज १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. के. लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम केदार यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण पार पडले. हेमंत कुळकर्णी यांनी उपस्थित नागरिकांना कोविड लसीकरण बाबतीत माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील, देवेंद्र पाटील, बबनराव पाटील, साहेबराव पाटील उपस्थित होते.
वाघडू येथे कोविड लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:13 AM