जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर जळगावचे तिघे आणि चाळीसगाच्या एका कर्मचाऱ्याला थंडी व तापाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, ही लक्षणे सौम्य असून त्यांना एकदोन दिवसांंत रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ही लक्षणे समोर आली आहेत.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन परिचारिकांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लस घेतली होती. त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक थंडी वाजायला लागली व तापही आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसाच त्रास रविवारी पहाटे एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना झाल्याने त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोट
जिल्ह्यात चार ते पाच कर्मचाऱ्यांना थंडी, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही लक्षणे सौम्य असून एकदोन दिवसांत त्यांना डिस्चार्जही देण्यात येईल. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक