जळगाव : दहा रुपयाचे नाणे स्विकारण्यावरुन चहा पावडर विक्रेता व ग्राहकात रविवारी दुपारी साडे बारा वाजता फळ गल्लीत वाद होवून त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. याप्रकरणी ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरुन दुकानदाराविरुध्द शहर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. समता नगर येथील रहिवासी बाळू आत्माराम महाजन हे मुलासोबत शहरात खरेदीसाठी आले होते. फळ गल्ली चहा पावडर दुकानावर चहा पावडर खरेदी करण्यासाठी गेले. त्यांनी तेथे ३८ रुपयांची चहा पावडर खरेदी केल्यानंतर त्यांनी दहाच्या तीन नोटा व एक दहा रुपयांचा नाणे दिले. यावेळी दुकान मालकांनी नाणे स्विकार करण्यास नकार देत महाजन यांच्याशी वाद घातला व त्यांना शिवीगाळ मारहाण केली. यावेळी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. या प्रकारानंतर महाजन यांनी मुलाला घेवून शहर पोलिस स्टेशन गाठून दुकान मालकांविरूध्द तक्रार दाखल केली. रिझर्व्ह बँक तसेच स्टेट बँकेकडून दहा रुपयांचे नाणे चलनातून बाद झाले नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे, मात्र तरीही कोणीही नाणे स्विकारत नाही.
१० रुपयांच्या नाण्यावरुन हाणामारी
By admin | Published: March 06, 2017 12:52 AM