आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १३ - आदिवासी भागात बालविवाह रोखण्यासाठी तसेच कुपोषण व बालमृत्यू होवू नये यासाठी विद्यापीठाने काही उपक्रम राबवावेत तसेच विशेषत: नंदुरबार जिह्यासाठी आदिवासींची संपूर्ण माहिती एकत्रित व्हावी यासाठी विकास सुचकांक तयार करा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केल्या.आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे व समिती सदस्यांनी १२ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट देवून आढावा घेतला. त्या वेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते, त्या वेळी त्यांनी सूचित केले. कांबळे यांच्या समवेत सदस्य सेवा मधुकर गायकवाड, सदस्य सचिव नरसिंग शेरखाने आणि आयोगाचे जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे उपस्थित होते.समितीने कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत कुलसचिव भ.भा.पाटील यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरलेल्या पदांची माहिती दिली. याशिवाय विद्यापीठाकडून राबविल्या जाणाºया विशेष योजनांचीदेखील माहिती दिली.आदिवासी मुलींच्या शिक्षणात अधिक वाढ होणे गरजेचेआदिवासी मुलींच्या शिक्षणात अधिक वाढ होणे गरजेचे आहे अशी भावनाही विजय कांबळे यांनी व्यक्त करून विद्यापीठाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी देखील यावेळी आयोगाची भेट घेवून काही मागण्या सादर केल्या. या बैठकीच्यावेळी विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यासाठी विकास सुचकांक तयार करा - विजय कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:14 PM
अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्षांनी घेतला विद्यापीठात आढावा
ठळक मुद्देघेतला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट देवून आढावा आदिवासी मुलींच्या शिक्षणात अधिक वाढ होणे गरजेचे