शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

गुन्हा २००६ मध्ये ; अटकसत्र २०१२ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 3:46 PM

घरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तब्बल सहा वर्ष या गुन्ह्याचा तपास धिम्या ...

घरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तब्बल सहा वर्ष या गुन्ह्याचा तपास धिम्या गतीनेच चालला. २०१२ मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे एकनाथराव खडसे यांनी हे प्रकरण उचलून धरल्याने २०१२ मध्ये तपासाधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी २८ जानेवारी २०१२ रोजी उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे मेजर वाणी, राजा मयुर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना अटक केली. या चौघांची पहिली अटक होती. त्यानंतर अटकसत्र सुरु झाले. १० मार्च २०१२ रोजी आमदार सुरेशदादा जैन यांना धरणगाव रेल्वेगेटजवळ अटक करण्यात आली. त्यानंतर २१ मे २०१२ रोजी तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर पोलिसा हजर झाले होते. मंत्री व पालकमंत्री असतानाही तपाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या दालनात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर अटकेची कारवाई झाली होती. घरकुल प्रकरणामुळेच देवकरांना मंत्रीपद सोडावे लागले होते. या गुन्ह्यातील संशयित सुरेशदादा जैन व प्रदीप रायसोनी हे दोघंच जास्त काळ कारागृहात राहिले.खडसेंनी केला होता पाठपुरावाघरकुल घोटाळ्याची फिर्याद २७ जानेवारी २००६ रोजी शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. खडसेंचे पूत्र निखील भाजप-सेना युतीचे उमेदवार होते, तर राष्टÑवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांचे पूत्र मनीष जैन हे खडसे पूत्राच्या विरोधात अपक्ष लढले होते. तेव्हा सुरेशदादा जैन यांनी युतीधर्म न पाळता अपक्ष जैन यांना निवडून आणले होते. त्यामुळे पूत्राचा पराभव खडसे यांच्या जिव्हारी लागल्याने तेव्हापासून खडसे व सुरेशदादा जैन यांच्यात दरी निर्माण झाली. त्याचा वचपा म्हणून खडसे यांनी घरकुल प्रकरण उचलून धरले आणि त्याच प्रकरणात सुरेशदादा जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती.घरकुलमुळे जैन, रायसोनीसंह अनेकांचे आयुष्य दावणीलाघरकुल प्रकरणामुळे अनेक राजकारण्यांचे आयुष्य दावणीला लागले. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, तत्कालिन पाकिलेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे मेजर वाणी, राजा मयुर व मुख्याधिकारी पी.डी.काळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. आजी, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांना अटक झालेली नसली तरी निकाल लागेपर्यंत घरकुलाचे भूत त्यांच्या मानगुटीवर होते.या प्रकरणामुळे सुरेशदादा जैन व रायसोनी यांची राजकीय कारकिर्दच धोक्यात आली तर देवकरांनाही मंत्री पद सोडावे लागले.दोन आजी-माजी मंत्री व आमदारांचा समावेशया गुन्ह्यात संशयिंत आरोपी म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांना या प्रकरणात अटक झालेली नव्हती. देवकर व जैन या दोन्ही माजी मंत्र्यांना अटक झाली होती.पाच वर्ष धुळ्यात खटल्याचे कामकाजन्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप, साक्षदारांवर दबाव येवू नये म्हणून १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जळगाव न्यायालयातून धुळे न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. पाच वर्ष धुळे न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. तत्कालिन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर या जामीनाला त्रयस्त अर्जदारांनी खंडपीठात आव्हान दिले होते. न्या.नलावडे यांनी देवकरांचा जामीन रद्द केला होता. त्यामुळे देवकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हाही त्रयस्त अर्जदारांनी हरकत घेतल्याने हा खटला जळगावपासून नजीक असलेल्या जिल्ह्यात अर्थात धुळे येथे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव