धुळे : देवपुरातील स्वामिनारायण मंदिराची संरक्षक भिंत पाडणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे व त्यांचा मुलगा तेजस गोटे यांच्यासह 30 ते 40 जणांविरुद्ध संशयावरून देवपूर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामिनारायण मंदिर या संस्थानने गेल्या 22 वर्षापासून 50 फूट रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी आमदार अनिल गोटे यांनी समर्थकांसह आंदोलन केले होत़े अतिक्रमण काढण्यावर गोटे ठाम होते, तर अतिक्रमण काढू नये यासाठी भाविकांनी भजन आंदोलन करत विरोध दर्शविला़ या घडामोडी सुरू असताना स्वामिनारायण मंदिराच्या मागील बाजूची संरक्षक भिंत जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली़ त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता़ आंदोलनामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या़ मंदिराचे भाविक नरेंद्र वसंत महाजन यांनी देवपूर पोलिसात गुरुवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार आमदार अनिल गोटे, त्यांचे पुत्र तेजस गोटे, दिलीप साळुंखे, अमोल सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे गणेश जाधव, नगरसेविका पुत्र मुन्ना हनुमंत वाडिले, प्रशांत भदाणे, मनोज वाल्हे, अॅड. अमित दुसाने, तुकाराम चौधरी यांच्यासह 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े
अनिल गोटेंविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 17, 2017 12:58 AM