लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यास बंदी घातल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काव्यरत्नावली ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत दुचाकी रॅली काढणाऱ्या आठ तरुणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध घालून देण्यात आलेले आहे. मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. बुधवारी शहरात अत्यंत साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. दुसरीकडे काही तरुणांनी काव्यरत्नावली चौक ते संत गाडगेबाबा चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना कळताच, त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. नंतर त्यांच्याविरुद्ध जमावबंदीचे उल्लंघन केले व साथीच्या रोगाचा संसर्गाचा फैलाव करण्याचा धोका निर्माण केला म्हणून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचावर गुन्हा दाखल
शुभम मिलिंद पवार (२५,रा.केदारनगर, पिंप्राळा), स्वप्नील खंडारे, शुभम संजय शिरसाळे, विशाल भीमराव खैरनार (तिघे रा.पिंप्राळा हुडको), जितेंद्र शरद सोनवणे (२१, रा.आसोदा), अनुराज मांगो सोनवणे (१८,शिरसोली), अनिरुद्ध सुनील गाढे (१८,रा.समतानगर), विक्की चावदस सोनवणे (१८,रा.शिरसोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.